जिल्हा परिषद शिक्षक व्यसनी असल्याने पत्नीने चिमुकल्या मुलीला घेऊन केला आत्महत्याचा प्रयत्‍न…

वेळीच माहिती मिळाल्याने दामिनी पथकाने वाचविला जीव :

सबला उत्कर्ष प्रतिनिधी वीना पाटणी :-
औरंगाबाद – जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेला पती दररोज दारू पिऊन मारहाण करतो या प्रकरणामुळे जीव नकोसा झाल्याने वैतागलेली पत्नी रविवारी दिनांक 23 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन वर्षाच्या चिमुकलीला घेऊन सरळ सलीम अली सरोवर जवळ येऊन बसली. ती धुमसून धुमसून रडत होती. तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले असता त्यांनी दामिनी पथकाला घटनास्थळी पाठवलेत.
पथकाने महिलेची समजून काढून तिला घरी नेऊन सोडले. पोलिसांनी वेळीच हजर होऊन मायलेकींचा जीव वाचविला. कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत . शिक्षकांना सुरुवातीला करण्याची कामे होती मागील काही दिवसांपासून ही कामेही कमी केली जात आहे त्यामुळे सध्या शिक्षकांना विशेष काम नाहीत .असाच एक शिक्षक हुडको 11 भागात राहतो त्याला दारूचे व्यसन आहे. यातून त्याचा सतत पत्नीशी वाद होता तो पत्नीला शिवीगाळ , मारहाण करत होता . सतत या प्रकरणामुळे ती पत्नी प्रचंड वैतागली होती . यातूनच रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ती तीन वर्षाचा चिमुकलीला घेऊन रडत रडत थेट सलीम अली सरोवर जवळ येऊन बसली दिल्लीगेट कडून हरसुल t-point कडे जाणारा रस्त्यावरील नागरिकांनी हा प्रकार पाहिला त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले असता दामिनी पथकाने उपनिरीक्षक वर्षाराणी आजले यांनी यांना दिली असता महिला जीव देऊ शकते हे गांभीर्य ओळखून पथक तात्काळ सलीम अली सरोवर जवळ पोहोचले ते महिलेला भेटले जमलेल्या नागरिकांना तिथून जायला सांगितले. महिलेला विश्वासात घेत तिची विचारपूस केली पोलिसांना पाहून महिला अधिकच रडायला लागली . वर्षाराणी आजले यांनी तिला समजावून सांगितले. तिला महिलांच्या अधिकाराची जाणीव करून दिली .त्यानंतर ती त्यांच्यासमोर बोलती झाली .


काय करणार मॅडम पती शिक्षक आहे, पण रोज दारू पिऊन येतो. शिवीगाळ आणि मारहाण करतो. सासू-सासरे आहेत पण तेही त्याला काहीच सांगत नाहीत. जीव नकोसा झाला आहे .असे त्या महिलेच्या तोंडून ऐकल्यानंतर आजले यांना नेमकं काय झालं हे लक्षात आले. त्यांनी महिलेची समजूत काढून तिला घरी सोडण्याची तैयारी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *