इजिप्त आणि इराणचा १३ टन कांदा पुण्यात आला, पण…

इजिप्त आणि इराणचा १३ टन कांदा पुण्यात आला, पण…

पुणे : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- कांद्याच्या दरात चढ उतार सुरू असताना अफगाणिस्तानपाठोपाठ इजिप्त, इराणचा कांदा आता पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल झाला आहे. मार्केट यार्डात शनिवारी इराण, इजिप्तच्या कांद्याची १३ टनाची आवक झाली. मात्र, पुण्यातील स्थानिक हॉटेलचालकांकडून मागणी नोंदविली गेली नाही. किरकोळ विक्रेत्यांनी केवळ तुरळक स्वरूपात खरेदी केली आहे. तसेच दक्षिणेतील व्यापाऱ्यांनी या कांद्याची १ टनापर्यंतची खरेदी केली आहे. त्यामुळे या तूर्तास कांद्याला फारशी पसंती नसल्याचे व्यापारी राजशेखर पाटील यांनी सांगितले.

इजिप्त, इराणच्या कांद्याला एका किलोला रविवारी ३५ रुपये दर मिळाला. दहा किलोला ३५० ते ३७५ रुपये दर मिळाला. इराणचा कांदा आकाराने मध्यम स्वरूपाचा आहे. त्याला मोड आले आहेत. तर भारतीय कांद्याच्या तुलनेत इजिप्तच्या कांद्याला फारशी चव नसल्याने त्याला मागणी नसल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले आहे. इजिप्तच्या कांद्यापेक्षा स्थानिक भागातील जुन्या कांद्याला अधिक पसंती असून त्याला एका किलोसाठी ३० ते ५० रुपये दर मिळत आहे.

गेल्या आठवड्यात पुण्यात कांद्याची टंचाइ जाणवत होती. त्यामुळे कांद्याचे घाऊक बाजारात ५० रुपयांपेक्षा अधिक दर पोहोचले होते. तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. मात्र जुन्या नव्या कांद्याची पुन्हा आवक झाल्याने तसेच मध्य प्रदेशातून नव्या कांद्याची जादा आवक झाल्याने गेल्या आठवड्यात दर उतरले होते. त्याच दरम्यान अफगाणिस्तानहून मुबईमार्गे पुण्यात कांदा आला होता. त्या कांद्याकडे पुणेकरांनी पाठ फिरविली होती. त्याला दक्षिणेतील व्यापाऱ्यांनी पसंती दर्शविली होती. कांद्याचा आकार मोठा असल्याने तसेच त्याला चव फारशी चांगली नसल्याने पुण्यातील हॉटेलचालकांनी या कांद्याला नापसंती दर्शविली होती व त्याकडे पाठ फिरविली होती. त्यानंतर आता काल, शनिवारी पुन्हा इजिप्त, इराण येथील कांद्याची आवक झाली. मात्र, त्या कांद्यालाही रविवारी फारशी मागणी नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. दिवाळीआधी कांद्याचे दर भडकले होते. त्याचा सामान्यांना मोठा झटका बसला होता. मात्र आता कांद्याचे दर पुन्हा खाली येत आहेत. आवक वाढल्याने ही स्थिती बदलली आहे.

?????

बातम्यांसाठी 7507370713 हा नंबर आपल्या हाँट्सअँप ग्रुपवर अँड करा

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *