भुसावळात महिला डॉक्टरची केली २९ हजारांत फसवणूक ; दुचाकी विक्रीच्या बहाण्याने ऑनलाइन गंडा…

भुसावळात महिला डॉक्टरची केली २९ हजारांत फसवणूक ; दुचाकी विक्रीच्या बहाण्याने ऑनलाइन गंडा.

भुसावळ : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- वेबसाइटवर दुचाकी विक्रीची जाहिरात टाकून दोन भामट्यांनी भुसावळातील महिला डॉक्टरची २९ हजार रुपयात फसवणूक केल्याची घटना नुकतिच घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

डॉ.रश्मी कुंदन कोटेचा (सराफ बाजार, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार १८ नोव्हेंबरला त्यांनी ओएलएक्स या वेबसाइटवर दुचाकी (क्रमांक-एम.एच.०३-डी.बी.७८८०) विक्री होत असल्याची जाहिरात पाहिली. त्यामुळे डॉ.कोटेचा यांनी जाहिरातीमधील क्रमांकावर संपर्क साधला.
संशयिताने इंडियन आर्मी रेजिमेंट ऑफीस क्रमांक ८४८०५०२९६४ या क्रमांकावर फोन पे द्वारे पैसे भरण्यास सांगितले. त्यामुळे डॉ.कोटेचा यांनी २९ हजार रूपये पाठवले. मात्र संशयीताने दुचाकी न देता डॉ.कोटेचा यांना धमकावले. संशयीत राजकुमार कैलास सेठ (पवई, मुंबई) व दुसरा अनोळखी संशयित यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *