….आणि या नेत्याच्या नावाने मांसाहारी डिश, तुम्हीच पहा काय आहे विशेष.

….आणि या नेत्याच्या नावाने मांसाहारी डिश, तुम्हीच पहा काय आहे विशेष

अमरावती : सबला उत्कर्ष न्युज ब्युरो :- राजकारणात सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस… मात्र या दोन नेत्यांची नावे सध्या वेगळ्या विषयामुळे चर्चेत येत आहे. अमरावती येथे या दोन्ही नेत्यांच्या नावाने एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बनविण्यात आले आहेत.

लॉकडाऊनमध्ये गेल्या सहा महिन्यापासून हॉटेल रेस्टॉरंट बंद होते. मात्र आता राज्य सरकारने निर्णय घेत हॉटेल आणि रेस्टॉरंट नागरिकांकरिता उघडे केले आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेलवर एकही पदार्थ न खाणाऱ्या नागरिक आता मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे

अमरावती येथे हेरिटेज किचन या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नावाने मांसाहारी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शाकाहारी काळी बनविण्यात आली आहे. राज्यातील हे दोन्ही नेते पॉवर्फुल असल्याने त्यांच्या नावाने ही विशेष बनविण्यात आल्याचे हॉटेल मालकाचे सांगण्यात आले.

या एका थाळीमध्ये दोघांचे जेवण होत असून अमरावतीकरांनी या दोन्ही थाळीला मन पसंती दर्शवली आहे. त्या दोन्ही थाळ्या हॉटेल मालकाचा गल्यात मोठ्या प्रमाणात पैसा टाकत असून ग्राहक सुद्धा अत्यंत चवीने ह्या दोन्ही थाल्याचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *