ट्रिपल सीट दुचाकीस्वाराची पोलिसाला मारहाण.

प्रतिनिधी भुसावळ मयूर वाघुळदे::- शहरातील खडकारोड परिसरात ट्रिपलसीट फिरणाऱ्या दुचाकीस्वारान पोलिसासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णाकुमार उदयसिंग याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री दाखल झाला.

पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे हे कर्तव्यावर असताना संशयित कृष्णाकुमार उदयसिंग दुचाकीवर ट्रिपलसीट जात होता. पोलिसाने त्याला हटकल्यावर त्याने हुज्जत घातली. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जात पोलिसाच्या गालावर चापट मारली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक कृष्ण भोये तपास करत आहेत. दरम्यान नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध धडक कारवाई करण्याची सूचना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *