अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान! : ना.गुलाबराव पाटील स्व.ज्योतीदेवी बयस यांच्या स्मरणार्थ अन्नपुर्णा भंडारचा शुभारंभ…

अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान! : ना.गुलाबराव पाटील
स्व.ज्योतीदेवी बयस यांच्या स्मरणार्थ अन्नपुर्णा भंडारचा शुभारंभ.

धरणगाव, प्रतिनिधी धनराज पाटील:- दान देण्याचे अनेक प्रकार आहेत. धन, दौलत, पैसा यांचे महत्व माणूस जिवंत असेल तरच असते. म्हणून, माणसाला जिवंत ठेवणारे अन्नदान हेच जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. जगाचा पोशिंदा उपाशी राहू नये म्हणून त्याच्या जेवणाची सोय करून आपल्या घरातील अन्नपूर्णेच्या स्मृती जतन करणे कौतुकास्पद कार्य असल्याचे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. उद्योगपती जिवनसिंह बयस यांनी पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केलेल्या स्व.ज्योतीदेवी अन्नपुर्णा भंडारच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रा.डी.आर.पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उद्योगपती जिवनसिंह बयस, नयन गुजराथी, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माणूस आणि पशूपक्षी यांच्यात देव शोधण्याची परंपरा संतांनी आपल्याला घालून दिली आहे. जीवघेण्या स्पर्धेच्या सद्याच्या काळात माणूसपण हरवले आहे. अशा काळात मातीत राबणारा बळीराजा निर्सगाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे. रक्ताचे पाणी करून आपले पीक बाजारात आणतांना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याची अबाळ होवू नये यासाठी उद्योगपती जिवनसिंह बयस यांनी पत्नी, माजी नगरसेविका स्व.ज्योतीताई बयस यांच्या जयंती दिनी मुन्नादेवी ॲण्ड मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशन कडून शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दारात भरपेट जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. स्व.ज्योतीदेवी बयस अन्नपूर्णा भंडारच्या माध्यमातून शहरातील निराधार, गरिब, ज्यांची दोन घासांसाठी सुध्दा अबाळ होते अशा 40 कुटूंबांना घरपोच दोन वेळेचे जेवण मोफत दिले जाणार असल्याचे सांगून ना.गुलाबराव पाटील यांनी बयस कुटूंबियांचे कौतुक केले.
याप्रसंगी विद्यापिठाचे सिनेट सदस्य प्रा.डी.आर पाटील यांनी स्व.ज्योतीतार्इंच्या स्मृतींना उजाळा दिला. स्व.ज्योतीताई या बयस कुटुंबातील अन्नपुर्णाच होत्या. अन्नदानाचा यज्ञ त्यांनी अखंड सुरू ठेवला होता. त्यांच्या जाण्याने हे कार्य बंद पडेल असे वाटत असतांना त्यांच्या कुटूंबियांनी सुरू केलेले स्व.ज्योतीदेवी बयस अन्नपूर्णा भंडार हे त्यांच्या स्मृतींना अखंड उजाळा देतील असे प्रतिपादन केले. बयस कुटूंबियांशी आपले लहानपणापासूनचे संबंध असल्याचे सांगून समाजाला नेहमीच देत राहण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्व.ज्योतीतार्इंच्या स्मृतींना उजाळा दिला. शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून धरणगाव पंचक्रोशीत अन्नदानाचा कोणाताही कार्यक्रम असे त्यात बयस कुटूंबाचा सहभाग राहतोच असे सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, महावीर जिनिंगचे संचालक सुभाषआबा पाटील, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, विलास महाजन, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, नंदकिशोर पाटील, माजी उपनगराध्यक्ष गजाननसिंह बयस, उद्योगपती वाल्मिक पाटील, दिलीपबापू पाटील, रविंद्र कंखरे, मोहन महाजन, पी.एम.पाटील, मंगलदास भाटिया, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, धिरेंद्र पुरभे, शैलेश चंदेल, प्रशांत देशमुख, श्री.सुर्यवंशीसर यांच्यासह जिनिंग, प्रेसिंगचे मालक, शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचलन किरण अग्निहोत्री यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास बयस, मुकेश बयस, निखील बयस, वान बयस, पंकज बयस, निलेश बयस, तेजेंद्र चंदेल, दत्तात्रय चौधरी, हर्षल बयस, राजू ठाकूर, यशपाल चंदेल, चेतन चंदेल, नीक बयस, महेंद्र बयस, बिपीन भाटिया, जितू बयस आदींनी परिश्रम घेतले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *