साकळीतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल…

साकळीतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल.

यावल : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- तालुक्यातील साकळी येथील रहिवासी एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली. साकळी येथील अल्पवयीन मुलीच्या पीडित आईने या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार तिची १५ वर्षीय मुलगी शनिवारी मैत्रिणीसोबत यावल येथे कपडे घेण्यास जाते असे खोटे सांगून घरून निघाली. मात्र नंतर एकटीचे कपडे घेतले व साकळीला येत आहे ,असे आईला मोबाइलद्वारे सांगितले. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक खांडबहाले करत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *