जामनेर तालुक्यातील पळसखेडा काकर येथिल समस्यांची सौ.वंदनाताई अशोक चौधरी यांनी घेतली दखल…

जामनेर तालुक्यातील पळसखेडा काकर येथिल समस्यांची सौ.वंदनाताई अशोक चौधरी यांनी घेतली दखल…

जामनेर : सबला उत्कर्ष प्रतिनिधी –
जामनेर तालुक्यातील देऊळगांव गुजरी ग्रुप ग्रामपंचायत मधील पळसखेडा काकर येथील घाणीच्या साम्राज्याची बातमी एका लोकल न्यूज चॅनल वर बघुन राष्ट्रवादी कांग्रेस महिला प्रदेश सचिव
मा.सौ.वंदनाताई अशोक चौधरी यांनी तात्काळ दखल घेतली.त्यांनी त्याच दिवशी म्हणजे दि.07 नोव्हेंबर वार शनिवार रोजी पळसखेडा काकर येथे भेट दिली. तेथे गेले असता अत्यंत विदारक अशी परिस्थिती बघायला मिळाली.अक्षरशः जनतेच्या आरोग्याशी खिलवाड होत असल्याचे दिसले.
पिण्याचे पाण्याची पाइपलाइन चे व्हॉल्व आणि गटार यात फरकच समजत नव्हता.
रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे.येथे 15 वर्षा पासून भाजप ची सत्ता आहे
▪जिल्हा परिषदेच्या आवारातील गट्टू बसविलेले दाखविले पण अस्तित्वात नाही.
▪स्मशानभूमी चे काम अपूर्ण अवस्थेत आहे.


सर्व योजना कागदांवर झाल्या की काय असा प्रश्न उपस्थित झाला.देऊळगांव ग्रुप ग्रामपंचायतिचा भोंगळ कारभार बद्दल तेथील ग्रामसथांनी व्यथा ताईंसमोर मांडल्या.
14 व्या वित्त आयोगचे पैसे फक्त कागदोपत्री आहेत प्रत्यक्षात काहीच नाही शाळेत गट्टू बसविले नाहीत , स्मशानभूमी अपूर्ण अवस्थेत आहे ,कुठल्याही योजनेचा लाभ अजून पर्यंत मिळाला नाही , एकही ग्रामसभा अद्याप झालेली नाही अनुसूचित जाती,जमातीच्या एकही योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळाला नसल्याचे त्यानी सांगितले. यावर सौ.वंदनाताई चौधरी यांनी तात्काळ बी डी ओ मॅडम यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क केला आणि त्यांना सदरील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले.तसेच अनुसूचित जाती जमातीच्या समस्यांसंदर्भात आदिवासी विकास कार्यालयात तात्काळ संपर्क साधून त्यांना ही सदरील बाब निदर्शनास आणून दिली. ताईंच्या या तात्काळ दखल घेण्याची कार्यतत्परता तसेच जनतेच्या आरोग्याबद्दल असणारी आत्मीयता बघून समाधान व्यक्त केले. माझी अशी मागणी आहे की याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर यांना न्याय मिळावा मी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेव यांच्या कडे हा विषय मांडणार आहे याप्रसंगी अशोकदादा चौधरी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *