सरपंच पदाची आरक्षण बाबत सभा….

Satish Tayade
( सबला उत्कर्ष )
Bureau : (Nashik)
मो. 8767648752

नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या शहादा तालुक्यातील 35 व नंदुरबार तालुक्यातील 41 अशा एकुण 76 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तालुकास्तरावर

सरपंच पदाची आरक्षण सोडत

नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या शहादा तालुक्यातील 35 व नंदुरबार तालुक्यातील 41 अशा एकुण 76 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तालुकास्तरावर 11 डिसेंबर 2020 रोजी शहादा व नंदुरबार तहसिल कार्यालयात काढण्यात येणार आहे.

तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकुण 519 ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायती अशा एकूण 595 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत 17 डिसेंबर 2020 रोजी ठिक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील बिरसामुडा सभागृहात काढण्यात येणार आहे. सदर आरक्षण हे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च2025 या पाच वर्षाच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणूका होऊन गठित होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी लागू असणार आहे.

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर सदर आरक्षण काढतांना घेण्यात येणाऱ्या सभेत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुर्नवसन विभाग तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक सुचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता या बाबींचे पालन होण्याबाबत कटाक्षाने काळजी घेण्यात यावी, असे उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी कळविले आहे.

लेखक
आयुष तायडे
7666338592
Whatsapp

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *