संतापजनक : साकरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ; एका विरुद्ध गुन्हा….

संतापजनक : साकरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ; एका विरुद्ध गुन्हा.

धरणगाव : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- धरणगाव तालुक्यातील साकरे येथे एका मद्यपीने सोमवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे

यासंदर्भात अधिक असे की सुभाष रामदास सोनवणे (धंदा. शेती रा.साकरे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ १६ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठ्याने आरडाओरडा करण्याचा आवाज ऐकू येत होता. म्हणून मी पुतळ्या जवळ गेले असता गावातील अशोक नामदेव पाटील हा दारूच्या नशेत मोठमोठ्याने आरोड्या मारत होता. त्यामुळे आमच्यातील कैलास पुंडलिक सोनवणे यांनी त्या समजून घरी जाण्यास सांगितले. परंतु तो दारूच्या नशेत असल्याने घरी गेला नाही. तसेच तो कुणाचेही ऐकत नव्हता, त्यामुळे मी घरी निघून गेलो. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कैलास सोनवणे हा माझ्या घरी आला व त्याने सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा चष्मा खाली पडलेला आहे. रात्री अशोक पाटील हा जोराने पुतळा हलवीत असल्यामुळे बाबासाहेबांच्या पुतळ्याचा चष्मा खाली पडलेला होता. त्यामुळे पोलीस पाटील श्याम भगवंत पाटील यांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. धरणगाव पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केल्यामुळे तणाव वाढला नाही.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *