राम रहीम तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला आणि गेला, कुणालाही भनकही नाही !

राम रहीम तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला आणि गेला, कुणालाही भनकही नाही !

सबला उत्कर्ष ब्युरो :- बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी आणि डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम याला भाजपच्या एका बड्या नेत्याच्या निर्देशावरून एक दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. २४ ऑक्टोबर रोजी राम रहीम तुरुंगातून पोलीस सुरक्षेच्या मोठ्या फौजफाट्यासहीत बाहेर आला आणि पुन्हा तुरुंगात गेला परंतु, याची कुणाला भनकही लागली नाही.
,चंदीगड :बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला गुपचूपपणे एका दिवसाची पॅरोल मंजूर करण्यात आल्याची बातमी समोर येतेय. हरियाणातील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप – जेजेपी सरकारनं २४ ऑक्टोबर रोजी राम रहीम याला पॅरोल दिला होता.
डेरा सच्चा सौदा प्रमुख बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर रोहतक तुरुंगात बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीम याला आजारी आईला भेटण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्या गुरुग्रामच्या एका रुग्णालयात भर्ती आहेत.

परंतु, राम रहीमला पॅरोल मंजूर करताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. राम रहीमला सुनारिया तुरुंगातून गुरुग्राम रुग्णालयापर्यंत मोठ्या सुरक्षेसहीत नेण्यात आलं.
जवळपास ३०० पोलीस तैनात
डेरा प्रमुख २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत आपल्या आईसोबत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या दरम्यान हरियाणा पोलिसांच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे एका तुकडीत ८० ते १०० जवानांचा सहभाग असतो. उल्लेखनीय म्हणजे, सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांनाही या गोष्टीची भनक नव्हती की कोणत्या व्यक्तीला एस्कॉर्ट करत होते.
गोपनियतेची संपूर्ण काळजी
राम रहीमला पडदे लावलेल्या पोलिसांच्याच एका गाडीतून गुरुग्राम रुग्णालयापर्यंत आणण्यात आलं. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये ही गाडी पार्क करण्यात आली. ज्या मजल्यावर राम रहीमच्या आईवर उपचार सुरु होते, तो संपूर्ण मजला रिकामा करण्यात आला.
आम्हाला तुरुंग अधीक्षकांकडून राम रहीमच्या गुरुग्राम दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचं निवेदन मिळालं होतं. त्यामुळे आमच्याकडून २४ ऑक्टोबर रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरक्षा उपलब्ध करून दिली होती’, असं म्हणतानाच रोहतक पोलीस अधीक्षक राहुल शर्मा यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *