अलका कुबल यांनी जाहीर माफी मागावी” अशी शिवबा संघटनेची मागणी…

“अलका कुबल यांनी जाहीर माफी मागावी” अशी शिवबा संघटनेची मागणी…

औरंगाबाद : सबला उत्कर्ष ( वीणा विजय पाटणी ) :- आई माझी काळूबाई या मालिकेच्या शूटिंग दरम्यान झालेल्या वादातून अलका कुबल यांनी स्वराज्यरक्षक संभाजी फेम महाराणी येसूबाई प्राजक्ता गायकवाड यांच्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत आणि महिलेला न शोभणारे अनेक वक्तव्ये केली.तसेच अभिनेता विवेक सांगळे याने सुद्धा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली व त्याला सतत निर्मात्या अलका कुबल यांनी पाठीशी घातले याच्या निषेधार्थ शिवबा संघटनेच्या वतीने आज प्राजक्ता ताई गायकवाड याची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे याची खात्री देण्यात आली व तुमच्या वर झालेला अन्यायासाठी पूर्ण ताकतीशी शिवबा संघटना सोबत आहोत असी ग्वाही देण्यात आली व अलका ताई कबूल व विवेक सांगळे यांनी जाहीर पणे माफी मागून विषय संपवून टाकावा… अन्यथा मालिकेचे कुठेही चित्रीकरण होऊ देणार नाही असा इशारा यावेळी राज्य सरकारला शिवबा संघटनेच्या वतीने देण्यात आला या वेळी शिवबा संघटना अध्यक्ष राजेंद्र जराड,प्रदेशध्यक्ष गणेश शिंदे, प्रदेश संपर्कप्रमुख मा देविदास पाठे पाटील प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्र्वर देवडे, युवती प्रदेशाध्यक्ष दिव्या पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष गोविंद कुमकर, , तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, भागवत सोळुंके, सर्व शिवबा संघटना पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *