माझे कुटुंब, माझी जबाबदारी” उपक्रमाचा देसाईगंजमध्ये प्रारंभ…

!! आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यात एकच वेळी मोहिमेला सुरुवात !!

देसाईगंज : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :-
करोनाच्या नियंत्रणासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी – कोविडमुक्‍त महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात देसाईगंज येथील पंचायत समिती सभागृहामध्ये
आ.कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या मोहिमेत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.


ज्येष्ठ नागरिकांमधील करोनाची लक्षणे शोधून त्यांना तातडीने उपचार मिळवून देणे आणि बाधित रुग्णांनी नंतर कोणती काळजी घ्यायची, याचे प्रबोधन करणे, या मोहिमेत अपेक्षित आहे. नागरिकांच्या शरीराचे तपमान व ऑक्‍सिजन पातळी तपासणार आहे. नागरिकांनी पथकाला सर्व माहिती द्यावी. ही मोहीम करोनापासून आपले रक्षण करण्यासाठी असून भीती बाळगू नये.करोनाची बाधा होऊ नये यासाठी आणि बाधितांनी व करोनामुक्‍त झालेल्यांनी कोणती खबरदारी घ्यावी.


यावेळी कार्यक्रमाला रेवताताई अलोने सभापती पंचायत समिती देसाईगंज, मा नानाभाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली, डॉक्टर अभिषेक कुंभरे तालुका आरोग्य अधिकारी देसाईगंज,डॉक्टर डॉ.आनंद ठिकरे आरोग्य अधिकारी आरमोरी,डॉक्टर विनोद मडावी तालुका आरोग्य अधिकारी कोरची, डॉक्टर सुरेश दामले तालुका आरोग्य अधिकारी कुरखेडा,डॉक्टर अशोक गहाणे एम ओ सावंगी,डॉक्टर पी जी सडमेक एम ओ कुरुड,विलासजी ढोरे,किशोर जी मेश्राम पत्रकार, जीतूभाऊ परसवाणी,तसेच पत्रकार व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *