भ्याड हल्ल्यात अंगरक्षकाने वाचविले,पोलीस अधीक्षकांचे प्राण…

【पोलिसांवरील हल्ल्यामुळे जिल्हाभर नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होतेय!】

【खासदारांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले! पण पालकमंत्र्यांचे मात्र मौन?】

नांदेड/जिल्हा प्रतिनिधी

जिल्ह्याभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मा.जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दि.२५ मार्च २०२१ ते ०४ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता,सदर लॉकडाउन कालावधीत नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण धार्मिक स्थळे, हॉटेल,रेस्टॉरंट,प्रार्थना स्थळे इ.बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले होते.

दरम्यान २९ मार्च रोजी होळी सणानिमित्त शीख समाजाच्यावतीने हल्ला बोल रॅली काढण्यात येते, सदर हल्ला बोल कार्यक्रमासाठी गुरुद्वारा बोर्डाने परवानगी मागितली होती,परंतु जिल्हाधिकारी,नांदेड यांनी काढलेल्या संचारबंदीच्या आदेश अनुषंगाने या हल्ला बोल कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली होती,तसेच हा हल्ला बोल काढू नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन व पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी गुरुद्वारा प्रशासकीय समिती व शीख समाजाचे धर्मगुरू यांच्याशी बैठका घेऊन हल्ला बोल कार्यक्रम काढण्यात येऊ नये,याबाबत त्यांना सूचित करण्यात आले होते,या बैठकांमध्ये गुरुद्वारा प्रशासकीय समितीने हल्ला बोल मिरवणूक काढणार नाही असे सांगितले होते,व शीख बांधवाना हल्ला बोल मिरवणूक गुरुद्वारा सचखंड परिसरात काढण्याचे आवाहन केले होते,गुरूद्वारा प्रशासनास हा हल्ला बोल कार्यक्रम मोठ्या प्रमाणात काढू नये म्हणून नोटिसाही देण्यात आल्या होत्या व प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती,सदर हल्ला बोल मिरवणुकीसाठी सचखंड गुरुद्वारा येथे योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.

२९ मार्च रोजी दुपारी ०४:०० वाजता गुरूद्वारा सचखंड येथे शीख बांधवांकडून अरदास होऊन आतमध्ये हल्ला बोल मिरवणूक काढण्यात आली,त्यावेळी शीख समाजाचे तरुण मुले मिरवणूक बाहेर काढण्याचे तयारीत होते,धर्मगुरू यांनी त्यांना बाहेर मिरवणूक काढू नये अशी विनंतीही केल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

तरीही काही तरुण मुलांनी पोलीस प्रशासनाचे काही एक न ऐकता गुरुद्वारा सचखंड गेट नं.१ समोरील बॅरिकेट तोडून बंदोबस्तावरील पोलिसांवर तलवारी व लाठ्या काठ्याने हल्ला केला,त्यात ०७ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून,पैकी ०२ गंभीर होते,व ०८ शासकीय वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने
०१) गुरनं.११३/२०२१ कलम ३०७,३२४,५०४,५०६,१४३,१४७,१४८,४९ भादंवि सह कलम ०४/२५ भा.हत्यार कायदा

०२.) पो.स्टे. वजिराबाद यांच्या फिर्यादीवरून
गुरनं. ११४/२०२१ कलम ३५३,३०७,१२०ब,३२६,३२४,३२३,३३२,३३६,४२७,१४३,१४७,१४८,१४९,२६९,२७०,२७१,१८६,१८८,५०४,५०६ भादंवि सह कलम ०४/२५ भा.ह.कायदा,कलम ०३,०४ सार्वजनिक मालमत्ता विद्रूपन कायदा,कलम०४,०७ क्रिमिनल लॉ अमेंडमेण्ट ऍक्ट,कलम ३ साथरोग प्रतिबंध कायदा,कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम ३७(१)(३),१३५ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे

०३.) गुरनं ११५/२०२१
कलम ३०७,३५३,३३३,४२७,१४३,१४७,१४८,१४९,२७९,२७०,१८८ भादंवि सह कलम ०४/२५ भा.ह.कायदा सह कलम ०७ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट १९३२ सह कलम ३७(१)(३) कलम १३५ बी ऍक्ट सह कलम ३,७ साथ रोग प्रतिबंधक कायदा सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा असे ३ गुन्हे दाखल करून सदर गुन्ह्यात १८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांतता आहे.

नांदेड जिल्ह्यातील जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने कोणाचीही गय केली जाणार नाही,सदर प्रकरणातील दोषींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी सांगितले…

पोलिसांवरील भ्याड हल्ल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे,पोलीसच सुरक्षित नाहीत तर आपले काय होणार? बंदोबस्त प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे यांची टीम काय करत होती? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेतून चर्चिले जात आहेत…

अंगरक्षक पांडे यांनी आपले कर्तव्य चोख बजावले असून,म्हणजेच (होता जिवा म्हणून वाचला शिवा) अश्या उक्तीप्रमाणे (होते पांडे म्हणून वाचले शेवाळे) असेही म्हणणे वावगे ठरणार नाही…


पत्रकारांशी बोलताना विचारलेले काही प्रश्न व पो.अधीक्षक यांचे उत्तरे

१. स्वसंरक्षणासाठी गोळीबार का केला नाही?

उत्तर – गोळीबाराने प्रश्न सुटत नाहीत.

२. टियर गॅस तर सोडायचे?

अनुत्तरित

३. या गर्दीतील तरुणाईला प्रोत्साहित कोणी केले का?

उत्तर – तपास सुरू आहे.

४. या अटकेत असलेल्या आरोपी यांच्याकडे अतिरिक्त शस्त्रसाठा सापडला का?

उत्तर – अजूनतरी काही नाही.

या हल्ल्यादरम्यान जास्तीतजास्त तरुणाईचा पुढाकार होता,त्यांनी पोलिसांनी नाकारलेल्या परवानगी चा विषय डोक्यात ठेवून हा हल्ला केला,यापूर्वीही दसरा सणाच्या वेळी सार्वजनिक कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने गुरुद्वारा बोर्ड सदस्य उच्च न्यायालयात गेले होते,परवानगी नसताना त्यांनी मिरवणूक काढली होती,व आम्ही त्याही वेळी गुन्हे दाखल केले होते,याप्रकरणात नक्की कठोर कारवाई होईल,यात मुख्य दोषी कोण आहेत हे शोधले जातील…

प्रमोद शेवाळे
पोलीस अधीक्षक,नांदेड


तक्रारीनुसार काही नावे

बलप्रितसिंघ उर्फ आशिष सपुरे, गुरमितसिंघ उर्फ बादल, देवेंद्रसिंघ महाजन, मनमोहनसिंघ उर्फ कुणालसिंघ राजेंद्रसिंघ नंबरदार, छोटा सरताज, नानकसिंघ बासरीवाले, ललन उर्फ लल्या भोलासिंघ, रणज्योतसिंघ जगिंदरसिंघ सुखोई, बलप्रितसिंघ चावला,मोनु बादलसिंघ, हरणेकसिंघ तोपची, रोनकसिंघ बलवंतसिंघ गाडीवाले, मन्नुसिंघ बलवंतसिंघ गाडीवाले, मोनुसिंघ बानसिंघ गाडीवाले, राजु मदनसिंघ बुंगई उर्फ किडा, सतनामसिंघ मनी, सुखा हुंदल, विक्की सुखा हुंदल, गब्बुग्रंथी, राजू महाजन, विक्की हंडी, जम्मू हंडी, राजू धुपिया, दिपसिंघ गुलाबसिंघ पाठी, बलबिरसिंघ उर्फ टिटू बुंगई, जोगी अवतारसिंघ पहरेदार, भजनसिंघ पहरेदार, मनिंदरसिंघ जसपालसिंघ लांगरी, बंटी ढिल्लो उर्फ पोंगा, अभिजित फोटोग्राफर, रविंदरसिंघ जंगी, जिंदरसिंघ सुखई, रोहित हरभजनसिंघ सेवादार, विक्रमसिंघ भजनसिंघ सेवादार, अवि रजू पुजारी, हरजित अरोरा, अवतारसिंघ गरेवाल, गोलु बोरगाववाले, मनसिजसिंघ रायके,चन्नु सिरपल्लीवाले,जपिंदरसिंघ उर्फ जप्पी, लाडी रागी, मोनु रायके उर्फ ढक्का, लक्की चंदासिंघ हकीम, अमनदिपसिंघ शहा, हरप्रितसिंघ हकीम, बंटीसिंघ अमोलसिंघ ढिल्लो उर्फ कोगा, राज बेंगन, कमलजितसिंघ, परमजितसिंघ, सुखासिंघ भगवानसिंघ बावरी, ब्रह्मा(शेरे पंजाब हॉटेलचा मुलगा), हरभजनसिंघ देवासिंघ पहरेदार, जसप्रितसिंघ हरभजनसिंघ सेवादार, जसविंदरसिंघ दिलपुर, रविंद्रसिंघ बुंगई, मनप्रितसिंघ कुंजिवाले, गुरमितसिंघ उर्फ राज महाजन, गुलाबसिंघ कंधारवाले, नौनिहालसिंघ जहागिरदार, देवेंद्रसिंघ मोटरवाले असे ६० व ३००,४०० लोकांचा उल्लेख आहे,या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार हे करणार आहेत…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *