अनैतिक संबंधाबाबत जाब विचारल्याने पत्नीस मारहाण…

अनैतिक संबंधाबाबत जाब विचारल्याने पत्नीस मारहाण.

प्रतिनिधी जळगाव >> गणपतीनगरातील माहेर असलेल्या ३३ वर्षीय विवाहितेच्या पतीने विवाहबाह्य अनैतिक संबध ठेवले. तसेच पैसे मागत पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणपती नगरातील तरुणीचे नवापूर तालुक्यातील पानबारा येथील तरुणाशी सन २०१५ मध्ये लग्न झाले. तिच्या पतीचे परस्त्रीशी संबंध असल्याची माहिती विवाहितेला समजली. याचा जाब तिने पतीस विचारला असता त्याने पत्नीस शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पैशांची मागणी करीत तीचा छळ केला.

या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सपकाळे तपास करीत आहेत. या प्रकरणाची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *