धक्कादायक! घटना निशाणे फाट्यावर भीषण अपघात तीन ठार….

धरणगाव (प्रतिनिधी) धनराज पाटील :- येथून जवळच असलेल्या निशाने फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवर असलेले सहाही जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यातील सुना मोहनलाल भिलाला (वय 23) हा तरुण मयत झाला आहे. तर पिंकी मूहलाल भिलाला( वय 22, रा.मध्य प्रदेश), नारायण लालसिंग बारेला (वय 20,रा.साळवा), दिलीप बारेला (वय 25 रा.साळवा), भरत बारेला (रा. साळवा), संगीता सिताराम भिलाला ( रा. मध्य प्रदेश) असे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगावला रवाना करण्यात आले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *