तैवान शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अंतिम मुदत जाहीर!

तैवान शिक्षण मंत्रालय,तैवान मध्ये अंडर ग्रॅज्युएट,पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तसेच भाषा अभ्यासक्रम शिकण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या पदवी व पदव्युत्तर कार्यक्रमाच्या आधारे मासिक वेतन रु.३८८७५ ते ६४७९२ पर्यंत देते.

नवी दिल्ली : सबला उत्कर्ष न्यूज –

तैवान शिक्षण मंत्रालय (moe) तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या आकर्षक शिष्यवृत्तीसाठी यशस्वीरीत्या अर्ज करण्याची ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत जवळ येत आहे.

दोन मोठ्या शिष्यवृत्ती moe तैवान शिष्यवृत्ती २०२१ आणि moe ह्युवायू (मॅडरिन) समृद्धी शिष्यवृत्ती २०२१ साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस जवळ येत असल्याने नवी दिल्लीतील तायपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र/(टीईसीसी) च्या अधिकृत प्रतिनिधीनी महाराष्ट्रातील जे विद्यार्थी तैवान मध्ये शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत,अश्या विद्यार्थ्यांना जलद गतीने अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे..

उत्कृष्ट भारतीय विद्यार्थ्यांना तैवान मध्ये पदवी अभ्यास आणि मॅडरिन भाषा अभ्यासक्रम शिकण्यास प्रोत्साहित प्रयत्ना अंतर्गत moe ही शिष्यवृत्ती प्रदान कर्ते जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांचे तैवान मधील शैक्षणिक वातावरनाशि परिचय आणि दोन लोकशाही दरम्यान द्विपक्षीय विनिमय कार्यक्रमास चालना मिळू शकेल.

तैवान चे शिक्षण मंत्रालय तैवान येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या कार्यक्रमाच्या आधारे मासिक वेतन देत पदवी अभ्यासक्रमासाठी रु.३८८७५ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रु.५१८३३ पर्यंत वेतन मिळते.

तर तैवान शिक्षण मंत्रालय ह्युवायू शिक्षण शिष्यवृत्ती अंतर्गत अंदाजे ₹ ६४७९२ पर्यंत मासिक वेतन देते,आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना तैवान मध्ये मॅडरिन भाषा शिकण्याचा अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तसेच मॅडरिन भाषा व तैवान संस्कृतीची ओळख वाढविण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
टीईसीसी च्या शिक्षणासाठी डिव्हिजन चे संचालक पिटर्स चैन यांच्या म्हणण्यानुसार विदेशी शिक्षण घेऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी तैवान वेगाने अव्वल स्थान बनते आहे,तैवानने वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच संधी उपलब्ध केल्या आहेत.
आमच्याकडे आशियाखंडातील उत्तम विद्यापीठ आहेत,तसेच क्यूज वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ च्या अहवालानुसार राष्ट्रीय तैवान युनिव्हर्सिटी जगातल्या ६६ व्या स्थानावर आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना तैवान मध्ये अभ्यास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आमच्याकडे भरपूर शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत,या शिष्यवृत्ती विषयाची सर्व माहिती टीईसीसी च्या वेबसाइटवर/तैवान च्या सरकारी वेबसाईटवर मिळू शकते असे संचालक पिटर्स चैन यांनी असे नमूद केले.

वर्ष २००३ मध्ये तैवान मध्ये फक्त ५ भारतीय विद्यार्थी शिकत होते,मात्र २०१९ मध्ये ही संख्या वाढून जवळपास २७८३ विद्यार्थ्यापर्यंत पोहचली आहे,बरोबर संचालक चैन यांनी महाराष्ट्रतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज अंतिम प्रक्रिया ३१ मार्च २०२१ च्या गोदर पूर्ण करावी असे आवाहन करत असताना,असे सांगितले की तैवान हे परदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीयांसाठी तेरावे अव्वल स्थान आहे,तसेच तैवानची प्रतिमा एक उपलब्ध।उरण देश अश्याप्रकारे उदयास येत आहे,आम्हाला अशी आशा आहे की,तैवान मध्ये जास्तीतजास्त भारतीय विद्यार्थी प्रवेश मिळवतील,शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्यासाठी त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थी टीईसीसी च्या अधिकृत वेबसाईटला (roc-taiwan.org) भेट देऊ शकतात…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *