तर नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही,पहा काय आहे नियम…

तर नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही,पहा काय आहे नियम.

पुणे : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला गॅस सिलेंडरची आवश्यकता भासत असते. प्रत्येकाला अन्न शिजवण्यासाठी आता गॅस सिलेंडर गरजेचे असल्याने गॅस सिलेंडर ची नितांत आवश्यकता झाली आहे. मात्र आता नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणे कठीण होणार आहे. याकरता वेगळे नियम सुद्धा करण्यात आले आहेत.

घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. गॅस सिलेंडरचा होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये आजपासून मोठे बदल करण्यात आले आहेत. गॅस सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी व ग्राहकांची योग्य ओळख पटण्यासाठी गॅस कंपन्यांनी डिलिव्हरी सिस्टम लागू केली आहे.
गॅस सिलेंडरचे या नवीन नियमानुसार केवळ बुकिंगच्या आधारावर आता घरापर्यंत डिलिव्हरी केली जाणार नाही. पूर्वी गॅस सिलेंडरची बुकिंग केली असता प्रत्येक नागरिकाला घरापर्यंत सिलेंडर मिळणे सोपे होते. मात्र ते आता नवीन नियमानुसार घरापर्यंत सिलेंडर मिळणे कठीण होणार आहे.

ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करताना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक कोड पाठविण्यात येणार आहे. गॅस एजन्सीला जोपर्यंत हा कोट मिळणार नाही. तोपर्यंत नागरिकांना गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार नाही असा हा नियम करण्यात आला आहे. ग्राहकांनी चुकीचा पत्ता आणि चुकीचा मोबाईल नंबर दिला तर त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. अशा ग्राहकांना घरापर्यंत सिलेंडर मिळणे कठीण होणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *