तरुणीवर अत्याचार करणाऱ्या पोलीस निरीक्षकास अटक करावी….. विश्व मराठा संघ जामनेर तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन सादर…


सबला उत्कर्ष :- प्रतिनिधी ( भावेश पाटील )
जामनेर:- तरुणीवर आत्याचार करणारा व महाराष्ट्र पोलिस खात्याला कलंक असणारा आरोपी विपिन हसबनीस पोलीस निरीक्षक कडेगाव जिल्हा सांगली. यांच्यावर सांगली जिल्ह्यातील कडेगांव पोलीस स्टेशन मध्ये पीडित तरुणीने गुन्हा दाखल केलेला असून, त्यास अटक करून घटनेची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी जामनेर येथील नायब तहसीलदार सुभाष कुंभार यांना .विश्व मराठा संघाच्या वतीने आज दि.८रोजी निवेदन देण्यात आले .त्याचे सविस्तर असे की ,सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी स्पर्धा परीक्षांच्या आभ्यासात मदत करण्याची बतावणी करून पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार केले आसल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित तरुणीने 28 ऑगस्ट रोजी कडेगाव पोलिस ठाण्यात अशी तक्रार दाखल केली आहे .या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या गुन्ह्याचा तपास इस्लामपूर चे उपाध्यक्ष कृष्णा पिंगळे यांच्याकडे सोपविला आहे. परंतु गेले दहा दिवस जाऊनही अत्याचार करणारा आरोपी हसबनीस याला अटक झालेली नाही. उलट आरोपी राजरोसपणे पीडित तरूणीवर दबावतंत्राचा वापर करून तसेच मोठ्या आर्थिक प्रलोभनाचे आमिष दाखवून तक्रार मागे घेणे संबंधी धमकावित आहे. तरी महाराष्ट्र पोलीस खात्याला कलंक व काळीमा फासणारा आरोपी राजरोसपणे मोकाट फिरत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी व निषेधार्थ बाब आहे .या काळात पीडित तरुणीच्या जीविताचे काही बरे- वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची व महाराष्ट्र पोलिसांची राहील.


याची दखल घ्यावी. तरी आरोपी हसबनीस यांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . कारवाई न झाल्यास विश्व मराठा संघाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष देवेंद्र साठे, उपतालुका अध्यक्ष आदित्य गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश पाटील, शहर अध्यक्ष अक्षय पाटील, शहर उपाध्यक्ष अक्षय कैलास पाटील, शहर सचिव गौरव पाटील, शहर कार्याध्यक्ष अनुप पाटील, अर्जुन पाटील, स्वप्नील शिंदे, विनायक पाटील, प्रीतम पाटील, मंगेश जाधव आदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *