जळगाव पिंप्राळ्यातील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या…

जळगाव पिंप्राळ्यातील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या.

जळगाव : सबला उत्कर्ष ( मयूर वागूळदे ) :- शहरातील बजरंग बोगद्यावरील रेल्वे रुळावर गुरुवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी पिंप्राळा हुडको येथील युवकाने डाऊन रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.

अविनाश शैलेद्र सोनवणे (वय २३, रा. दीक्षाभूमीनगर पिंप्राळा, हुडको) असे मृत युवकाचे नाव आहे. तो हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करीत होता. गुरुवारी सकाळी त्याने चायनीज खाद्यपदार्थ बनवण्यासाठी किराणा आणला. त्यानंतर तो घराबाहेर पडला होता.

दुपारी १ वाजेनंतर त्याने बजरंग पुलावर डाऊन रेल्वेखाली आत्महत्या केली. घटनास्थळाजवळ त्याची दुचाकी आढळून आली आहे. स्टेशन मास्तर आर.के. पालरेचा यांनी याबाबत मेमोद्वारे लोहमार्ग पोलिसांना कळवले.

सचिनकुमार भावसार व किशोर पाटील यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. अविनाश याचा साखरपुडा झालेला होता.

दिवाळीनंतर त्याचा विवाह होणार होता. मात्र, त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, हे स्पष्ट झालेले नाही. अविनाश याचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला अाहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *