मुक्ताईनगरात नवरात्रोत्सव असूनही संत मुक्ताई मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट…

मुक्ताईनगरात नवरात्रोत्सव असूनही संत मुक्ताई मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट

मुक्ताईनगर : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- दरवर्षी नवरात्रौत्सवात संत मुक्ताई समाधीस्थळ कोथळी येथे विविध धार्मिक कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थिती देतात. यंदा कोरोनामुळे संत मुक्ताई मंदिर सात महिन्यांपासून बंद आहे. केवळ नित्योपचार पूजाअर्चा व मुक्ताई विजय इत्यादी कार्यक्रम मोजक्याच भाविकांच्या उपस्थित होत आहे.

मुक्ताई मंदिर भाविकांसाठी बंद आहे. मंदिरात दैनिक नित्योपचार, काकड आरती, अभिषेक, पूजा, जप, भजन, हरिपाठ, प्रवचन आधी कार्यक्रम नित्यनेमाने चालू आहेत. परंतू भाविकांची गर्दी नसल्याने नवरात्रीत पहिल्यांदाच शुकशुकाट जाणवत आहे. ऑनलाइन पद्धतीने अनेक भाविक दररोज संत मुक्ताईचे दर्शन घेत आहेत. तसेच नऊ दिवस संत मुक्ताई विजय पारायण आॅनलाइन होत आहे. त्यात भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *