अमळनेरात रेल्वेखाली झोकून एकाची आत्महत्या.

अमळनेरात रेल्वेखाली झोकून एकाची आत्महत्या.

अमळनेर : सबला उत्कर्ष न्यूज प्रतिनिधी : – सुरतकडे जाणाऱ्या मालगाडीखाली झोकून देऊन ४० वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली. ही घटना २ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहराच्या पश्चिमेला एक किमी अंतरावर घडली.

जीन्स आणि टी शर्ट घातलेल्या व दाढी वाढवलेल्या प्रौढाने स्वतःला धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिले. यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रौढाच्या हातावर हातावर माँ व इंग्रजी अक्षरात एन असे अक्षर गोंधले आहे. मंगळवारी देखील त्याची ओळख पटली नाही. रहीम हमीद मेहतर याच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *