जळगावात विधवा वहिनीवर बलात्कार करणारा दीर अटकेत…

जळगावात विधवा वहिनीवर बलात्कार करणारा दीर अटकेत.

जळगाव प्रतिनिधी (मयुर वाघुळदे) :- शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या सख्ख्या भावाच्या विधवा पत्नीवर नराधम दीराने बलात्कार केल्याचे आज सकाळी उघकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दीराला अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, सुप्रिम कॉलनीतील शिवाजी चौकात ३५ वर्षीय महिला आपल्या सासू व दोन मुलांसह भाड्याच्या खोलीत राहते. हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. १ वर्षांपुर्वी महिलेचे पती यांचे निधन झाले आहे. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२.३० वाजता महिला झोपले. शेजारच्या पलंगावर त्यांचे दिर झोपले होते. रात्री १ वाजेच्या सुमार बाथरूमसाठी उठले होते. त्याचवेळी संशयित आरोपी दिर हा उठून मला तू आवडते असे बोलून विधवा वहिनीशी अंगलट केले. तसेच विधवा महिलेचा हात पकडून बाथरूममध्ये ओढून बलात्कार केला. कुणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सकाळी हा प्रकार पीडितेने आपल्या बहिणीला सांगितले. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, इम्रान सय्यद, विजय बावस्कर, रवींद्र चौधरी, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी याला शहरातील फुले मार्केटमधून अटक केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *