परभणी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांना साडेचार लाख रुपये लाच गेतांना रंगेहाथ पकडले…

परभणी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांना साडेचार लाख रुपये लाच गेतांना रंगेहाथ पकडले एसीबी ची करवाई….


परभणी :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारल्याने खळबळ उडाली आहे. उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी साडेचार लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार दाखल झाल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे. स्वाती सुर्यवंशीने लाचेची रक्कम सिनियर क्लार्क श्रीकांत करभाजने यास देण्याचे सांगितले. फिर्यादीने करभाजने देण्यास गेल्यानंतर अभियंता हकीम अब्दुल कय्यूम यांना देण्यास सांगितले. पैसे स्विकारल्यानंतर रंगेहाथ पकडले. उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी, अभियंता हकीम व क्लार्क करभाजने यास अटक केली आहे.

कार्यवाही झाल्याची बातमी महसूल विभाग आणि मराठवाड्यात पसरली तर खळबळ उडाली. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसपी कल्पना बावस्कर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक भरत हंबे, पिआय अतुल कडू, जमीलोद्दीन जागिरदार, शेख शकील, अनिल कटारे, माणिक चट्टे, अनिरुद्ध कुलकर्णी, सचिन धबडगे, शेख मुखीद, सारिक टेहरे, मुक्तार, जनार्दन कदम, रमेश चौधरी यांनी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *