मेळघाटात संघटित शिकाऱ्यांची टोळी अटकेत, शिकार झालेल्या पक्षींचे फोटो पाहून ह्वाल थक्क !

मेळघाटात संघटित शिकाऱ्यांची टोळी अटकेत, शिकार झालेल्या पक्षींचे फोटो पाहून ह्वाल थक्क !

अकोट : सबला उत्कर्ष न्युज ( मयूर वागूळदे ) : – वन्यजीव विभागांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे बंदुकीच्या साहाय्याने पक्षांची शिकार करणाऱ्या संघटित शिकाऱ्यांची टोळी वन विभागाने अटक केली. यामध्ये तीन आरोपींना जेरबंद करत 9 मृतपक्षी वाहनगाडी असा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी वनविभाग अधिक तपास करीत आहे.

बंदुकीने पक्षांची शिकार करत असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संरक्षण दल यांना मिळाली. त्यावरून अकोट- तेल्हारा- सोनाळा या टी पॉइंटवर ढाब्याजवळ सापळा रचण्यात आला. यादरम्यान एमएच 12 एम डब्ल्यू 8412 या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये वाहनचालक, दोन व्यक्ती आढळून आले. शिकाऱ्याकडे 6 रातवा पक्षी, 2 पारवा पक्षी, 1 जंगली कबूतर असे एकूण 9 पक्षी शिकार केलेल्या मृत अवस्थेमध्ये आढळून आले.
यावेळी मोहम्मद फैजल मोहम्मद इस्माईल, इम्तियाज अहमद नजीमोद्दिन अहमद, मोहम्मद इमरान मोहम्मद उस्मान, सर्व रा. मालेगाव जिल्हा नाशिक यांना अटक करून भारतीय वन अधिनियम तसेच वन्य जीव संरक्षण अधिनियमचे विविध कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले. यादरम्यान गाडीची तपासणी केली असता आरोपीकडून एक एअरगन, 25 छर्रे बुलेट, एक चाकू, एक बॅटरी, घटनास्थळावरून जप्त करण्यात आली.

पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्प एस एम रेड्डी, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, वान रेंजचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण डी पाटिल, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक विश्वनाथ चव्हाण, वनपाल एम.सी. ठाकूर, वनरक्षक, सरंजू भारती, एम बी अंभोरे, कैलास चौधरी आदींनी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *