*अल्पसंख्यांक दिनानिमित्त धरणे आंदोलन* *मुस्लिम समाजासोबत दुजाभाव करू नका, जळगावात उर्दू घर चे त्वरित बांधकाम करून द्या मागणी*

*अल्पसंख्यांक दिनानिमित्त धरणे आंदोलन**मुस्लिम समाजासोबत दुजाभाव करू नका, जळगावात उर्दू घर चे त्वरित बांधकाम करून द्या मागणी*

जळगाव – भारतातील व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचे विशेषता शिक्षण आरक्षण व संरक्षणाचे प्रश्न अत्यंत बिकट होत चालले आहेत संविधानाने शासनास कुठल्याही प्रकारचे भेदाभेद न करता सर्व क्षेत्रांमध्ये अल्पसंख्याकांना समान न्याय देणे विषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत पण दुर्दैवाने देशातील व राज्यात सत्तेवर असलेल्या शासनाकडून अल्पसंख्याकांना व खास करून मुस्लिम समाजा सोबत दुजाभाव होताना दिसत आहे त्यामुळे मुस्लिम समाज सर्व क्षेत्रात मागे राहिला या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात १८ डिसेंबर आंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक दीना निमित्त जळगाव शहरातील व जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक साहित्य क्रीडा व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुस्लिम व हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन केले*१२ मागण्यांचे निवेदन*यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना १२ मागण्याचे निवेदन महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मूर्म, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच भारत सरकार व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग यांना निवेदनाच्या प्रति सादर करण्यात आल्या. *आंदोलनात यांनी केले मार्गदर्शन*फारुक शेख यांनी धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी व निवेदनाचे वाचन केले,धरणे आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, एम आय एम ,रिपब्लिक, कॅमुनिस्ट पक्षा सह विविध बिरादरी, धार्मिक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यात प्रामुख्याने मुफ्ती हारून नदवी, मौलाना बापू शहा ,मुबारक तडवी, मुकुंद सपकाळे, प्रदीप पवार, बंटी भैया पाटील, प्रभाकर आप्पा, ज्ञानेश्वर कोळी, आशुतोष पवार, देविदास ठाकरे, किरण कुमार, मजहर खान ,अहमद सर ,सलीम इनामदार, जहांगीर खान, युसुफ शाह, अनवर शिकलगर , अमजद पठाण शिबान फाईज , ऍड आमीर शेख, ऍड आरीफ पटेल, उजेफा बागवान,रिजवान जागीरदार, सय्यद चांद, ताहेर शेख, अनिस शाह,रईस बागवान, फहीम पटेल, अर्शद शेख,साहिल पठाण, अल्ताफ शेख, अब्दुल हमीद शेख, शाहीर तेली,अख्तर भिस्ती, आबीद खान, फरीद मुशिर खान, जमादार झफरुल्ला,नशिराबाद चे जफर शेख, झाकीर शेख,अख्तर शेख, वसिम शेख, साहिल खाटीक, आदींची उपस्थिती होती फोटो१)धरणे आंदोलन करतांना२) आर डी सी सोपान कासार यांना निवेदन देताना फारुक शेख आदी दिसत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *