मोठे उद्योगपती बेपत्ता – पहा नेमके काय घडले…

मोठे उद्योगपती बेपत्ता – पहा नेमके काय घडले.

पुणे : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- वाहन उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ते बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन ला दिली आहे

वाहन उद्योग क्षेत्रात गौतम पाषाणकर यांचे प्रसिद्ध उद्योगपती म्हणून नाव घेतले जाते. मात्र ते बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली आहे. गौतम पाषाणकर बेपत्ता असल्याने उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन गौतम पाषाणकर यांचा शोध सुरू केला आहे

गौतम पाषाणकर यांचे नेमके काय झाले? ते कुठे गेले? हे अद्यापही समोर आले नाही. मात्र त्यांची सुसाईड नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दरम्यान पोलिसांनी चालकाला फोन लावल्यास चालकाचं फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समोर आले. तर या प्रकरणाचा तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईड नोट असल्याचे तपासात समोर आले आहे

व्यवसाय झालेल्या प्रचंड मोठ्या नुकसानीमुळे उद्योगपती गौतम पाषाणकर यांनी चालकाकडे सुसाईड नोट घेऊन बेपत्ता झाल्याचेही बोलले जात आहे. व्यवसाय झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याचे शिवाजीनगर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *