चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथे कांदा रोपांची चोरीची घटना घडल्याने सर्व शेतकरी चिंताजनक…

कांद्याचे रोप.

नाशिक : सबला उत्कर्ष प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून हिरव्या सोन्याची चोरी झाल्याची ची घटना निदर्शनात आली असून.भोयेगाव चांदवड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी दौलत महाराज ठोंबरे यांनी मात्र आपला रानात या हिरव्या सोनाला खूपच जपले जिल्ह्यात कोणाला ही रोपे मिळत नसल्याने व कोणाचेही चांगले रोपे नसल्याने दौलत महाराजांचे चार पायली बियाणांचे रोप खूपच डोलदार आले त्यातूनच त्यांनी दोन एकर कांद्याची लागवड ही केली दिवसभर त्यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली आणि रात्री ते आपल्या घरी गेले आणि इकडे चोरट्यांनी त्यांच्या शेतातील पाच वाफे कांद्याचे रोप रात्रीच्या वेळेस उपडून 20 गुंठे क्षेत्रावर कांद्याची लागवड होईल एवढे रोप चोरीला गेल्याने ठोंबरे हवालदिल झाले. तसेच जवळपास वीस हजार रुपये किमतीचे रोप चोरीला गेले खरे पण यातून मिळणारे कांद्याची उत्पन्नही आता गेल्याने त्यांचे कुटुंब हतबल झाले आहे. आता चक्क शेतातून रोपे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *