भाजपा युवा मोर्चा शहादा तालुका तर्फे तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले…
भाजपा युवा मोर्चा शहादा तालुका तर्फे तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
धरणगाव प्रतिनिधी, धनराज पाटील:- आज दिनांक 1जानेवारी 2021 रोजी औरंगाबाद येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार विरोधात राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाच्या विरोधात शहादा तालुका भारतीय जनता युवा मोर्चा कडून आज शहादा येथे नायब तहसीलदार शिरसाठ साहेब यांना निवेदन देण्यात आले.
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी चा युवक प्रदेशाध्यक्ष याच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अद्याप पर्यंत या राष्ट्रवादी च्या युवक प्रदेशाध्यक्षला अटक देखील झाली नाही व यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकत्यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत आरोपी वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष रामाशंकर भाऊ माळी.सरचिटणीस सचिनभाऊ देवरे.युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद भाऊ पाटील.सरचिटणीस तुषारभाऊ चित्ते.चिटणीस मोहन भाऊ मराठे,कार्तिक आप्पा नाईक.सदस्य जगदीश भाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते सगरभाऊ मराठे यावेळी उपस्थित होते.