सिडको एम.आय.डी.सी. हद्दीत,कपडा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड!

【ग्रामीण पोलीस स्थानक पथकाची धडक व दिमाखदार तपास मोहीम!】

【तीन मुख्य आरोपी व एक सह आरोपी असे चार आरोपी आद्यप कैद आहेत!】

नांदेड/गजानन जोशी

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत दि.१७ मार्च २०२१ रोजीच्या मध्यरात्री ०१:०० ते ०५:०० सुमारास एम.आय.डी.सी नांदेड येथील डीझॉल कॅज्युअल प्रा.लि या कंपनीचे गोडाउन येथे अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील शटर तोडून आत असलेले ९ कॅमेऱ्याचे मुख्य वायरिंग तोडून आपला चेहरा व शरीर लपवून गोदामातील १. फाईव्ह पीस सूट – २६० नग,किंमत १५,८६०००/-
२. लहान मुलांचे किड्स जीन्स – २०० नग,किंमत ८००००/-
३. मेन्स शर्ट – ३९ नग,किंमत १९५००/-
४. फोर वे पँट – २२१ नग,किंमत १,१०,५००
५. मेन्स जीन्स पॅन्ट – ३९ नग,किंमत २८४८३०
६. कंप्युटर मॉनिटर – २,सी.पी.यू – २,वायफाय राऊटर – असे किमती ४००००/- रुपये
७. डॉप मधील नगदी ५००/-
८. पेन ड्राईव्ह – १०००/-

असा एकूण २१,५७,५००/- रुपयांचे कपडे व इतर मुद्देमाल अज्ञात चोरट्याने दि.१७-०३-२०२१ रोजी चोरून नेल्याबाबत फिर्यादी इरफान खान अजीज खान मॅनेजर डिज़ॉन कॅज्युअल प्रा.लि. रा.हैदरबाग देगलुर नाका नांदेड यांनी १७ मार्च रोजी पोलीस स्थानक ग्रामीण नांदेड येथे फिर्याद दिल्याने गुरनं.१७६/२०२१ कलम ३८०,४६१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथक प्रमुख असद शेख पो.उप.निरीक्षक यांना दिला होता..

सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतर मा.अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,स्थागु शाखा पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,सपोनि भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे.ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व अंमलदार असे गुप्त बातमीदार यांच्यामार्फत माहिती काढून व प्रत्येकाने वेगवेगळे कौशल्य वापरून सदर गुन्ह्यातील आरोपीतांची माहिती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले.

दि.२५ मार्च २०२१ रोजी गुन्ह्यातील आरोपी नामे दिगंबर तुकाराम धुमाळे रा.वाघाळा,नामदेव संभाजी मुंढे रा.श्रीपाद नगर कोठा,नांदेड,नरसिंग रामकीशन ओझा रा.जुना मोंढा नांदेड यांना अटक करून त्यांचे कडून चोरी गेलेला
१.फाईव्ह पीस सूट २१४ नग,किंमत-१३,०५,४००/-
२. लहान मुलांचे किड्स जीन्स १२६ नग,किमती १,१०,५००/-
३. मेन्स शर्ट – ३९ नग,१९५००/-
४. फोर वे पँट २२१नग,किमती१,१०,५००/-
५. मेन्स जीन्स पँट – ५१४नग,किमती २,८४,८३०/-
६. गुन्ह्यातील चोरीचा माल घेऊन जाण्यासाठी गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलँड कम्पनीचे टेम्पो एम.एच.२६ बी.ई. किमत ५०००००/- असा एकूण २२,७०,१६०/- मुद्देमाल आरोपीतांकडून जप्त करण्यात आलेला आहे,सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी व सह आरोपी यादव चव्हाण यांसह चौघांना दि.२९ मार्च २०२१ रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली,असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास मा.वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकातील पो.उप.निरीक्षक असद शेख व रायटर नामदेव मोरे व पोलीस स्थानक ग्रामीण,नांदेड येथील पोलीस अधिकारी,अंमलदार हवं नमूद आरोपिताबाबत इतर राज्यातून पूर्व इतिहासाबाबत तपास करत आहेत…

सदर गुन्ह्यातील आरोपीतांकडून जप्त करण्यात आलेले मुद्देमालाबाबत पथकातील टीमचे प्रमोद शेवाळे – पोलीस अधीक्षक,नांदेड,निलेश मोरे – अप्पर पोलीस अधीक्षक,नांदेड,विजय कबाडे – अप्पर पोलीस अधिक्षक,भोकर,डॉ.सिद्धेश्वर भोरे उप विभागीय पोलीस अधिकारी,इतवारा-नांदेड,विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग,नांदेड शहर या सर्वांनी कौतुक केले…

हा मुद्देमाल काही काळ उस्माननगर येथे ठेवलेला होता,अल्पावधीतच लोहा येथे विक्रीसाठी नेला असल्याचे तपासात आढळले,तर या महागडे कपडे विक्रीसाठी कोणत्या इतर व्यक्तींचा संबंध आहे का? याचा तपास सुरू आहे…

डॉ.सिद्धेश्वर भोरे
उप विभागीय पोलीस अधिकारी
इतवारा,नांदेड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *