संभाजीनगर – महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय…

संभाजीनगर – महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय…
संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी-

सबला उत्कर्ष ब्युरो ( सतिष तायडे ) :- संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पहाटे 5 वाजता संप काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार सतीश भानुदासराव चव्हाण 57 हजार मताधिक्याची आघाडी घेऊन दणदणीत विजय झाले आहेत.
कोरोनाच्या सावटाखाली संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी एक डिसेंबर रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. 64.54 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी संभाजीनगरातील कलाग्राम परिसरात असलेल्या मराठवाडा री लेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत झाली . विक्रमी मतदान आणि विक्रमी उमेदवारांची संख्या यामुळे मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने पार पडली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *