रेमिडिसीविर औषधाचा कृत्रिम तुटवडा दूर केला नाही तर भाजपचे घेराव आंदोलन – प्रविण साले.

रेमिडिसीविर औषधाचा कृत्रिम तुटवडा दूर केला नाही तर भाजपचे घेराव आंदोलन – प्रविण साले.

नांदेड/प्रतिनिधी ( सबला उत्कर्ष )

जिल्ह्यात होत असलेल्या रेमिडिसीविर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा त्वरित दूर करावा नसता भाजपतर्फे घेराव आंदोलन करण्यात येईल असे निवेदन औषधी सहआयुक्त राठोड यांना भाजपतर्फे देण्यात आले आहे .

महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली विजय गंभीरे संघटन सरचिटणीस,जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर ,राज यादव सोशल मीडिया,प्रभारी कोविड वॉर रूम केदार नांदेडकर,गजानन जोशी यांनी राठोड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.कोरोना आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता,गत २,३ आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यात रेमिडिसीविर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा करण्यात येतो आहे,त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांना कोविड हॉस्पिटल येथील औषधी दुकानात इंजेक्शन मिळत नसल्यामुळे सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड तणावात आहेत,काहीजण साठेबाज इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत,तसेच आपण नियुक्त केलेले अधिकारी मोबाईल (दूरध्वनी) उचलत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वांना रेमिडिसीविर हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत देण्याची व्यवस्था करावी,नाहीतर नाईलाजास्तव भारतीय जनता पार्टी,महानगर नांदेड तर्फे “घेराव आंदोलन” करण्यात येईल,याची नोंद घ्यावी,असे निवेदन राठोड ,सहायक आयुक्त औषध विभाग-नांदेड यांना दिले.

— चौकट —

रेमिडिसीविर इंजेक्शन चा कृत्रिम तुटवडा जाणवून,काळाबाजर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,कारण रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक त्रस्त आहेत,हे आम्ही भाजपा कोविड वॉर रूम मध्ये येत असलेल्या फोनद्वारे गंभीर स्थिती निदर्शनास येते आहे…

प्रविण साले
भाजपा-महानगराध्यक्ष,नांदेड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *