भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाने महामार्गची वाहतूक ठप्प!

*भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाने महामार्गची वाहतूक ठप्प!* नांदेड/गजानन जोशीओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकविण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ नांदेड महानगर भाजपाच्यावतीने सिडको नजिकच्या चंदासिंगकॉर्नर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. हे आंदोलन भाजपाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. नांदेड महानगर भाजपाच्यावतीने सिडको परिसरात सकाळी १०/वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. भाजपाच्या चक्काजाम आंदोलनामुळे नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी काकांडी पर्यंत झाली होती.या आंदोलनात भाजपाचे हजाराहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपाच्या या रास्तारोको आंदोलनामुळे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आंदोलनातील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन कांही काळ रास्तारोको आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे. यावेळी खा.चिखलीकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीकास्त्र सोडले. त्यानंतर खासदार पुढील आंदोलनासाठी रवाना झाल्यानंतर भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु ठेवण्यात आले होते. दुपारी १२ वाजता पोलिसांनी आंदोलनकर्ते प्रविण साले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना अटक करुन नंतर त्यांची सुटकाही केली. भाजपाच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांची लांब रांग लागली होती हे विशेष!आंदोलनस्थळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष व्यंकटेश जिंदम, वैजनाथ देशमुख, व्यंकट मोकले आदिंची भाषणे झाली.प्रास्ताविक धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकूर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगरचे प्रसिध्दीप्रमुख धीरज स्वामी यांनी केले…भाजपाच्या या चक्काजाम आंदोलनात प्रदेश भाजपाचे कार्यकारिणी सदस्य डॉ.संतुकराव हंबर्डे,चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, मिलींद देशमुख,भाजपा जिल्हा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे,संध्या राठोड यांच्यासह शहर भाजपाचे पदाधिकारी शितल भालके,बालाजी पुणेगांवकर,भाजपाओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम,सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगांवकर, दिलीप भाऊ ठाकूर, उपाध्यक्ष आनिलसिंग हजारी, बागड्या यादव, शितल खांडील, सुशील चव्हाण,नवल पोकर्णा, परमवीरसिंग मल्होत्रा,संजय सुकळीकर,धीरज स्वामी, संजय घोगरे, श्रीराज चक्रवार, शैलेंद्र ठाकूर, विश्वंभर शिंदे, महादेवी मठपती, वैशाली देबडवार, रत्नप्रभा गोपीवाढ, अर्चना बर्कले, विपूल मोळके, शततारका पांढरे, अश्विनी महाले,श्रद्धाताई चव्हाण, अविनाश नाईक,चंचलसिंग जाट, बालाजी गिरगावकर,अकबरखान पठाण, शंकर मनमाडकर, अनिल गाजुला,शंकर पानेगावकर,अमोल कुलथे,संतोष कांडेकर,सचिन रावका,डॉ.सचिन पाटील उमरेकर,शैलेश कराळे,रमेश गटलेवार,अरविंद भारतीया,वैजनाथ देशमुख, सूर्यकांत कदम, संदीप कराळे, निल मोरे, बजरंग ठाकुर, हरभजनसिंग पुजारी, केदार नांदेडकर, कीर्ती छेडा, मनोज यादव, अभिषेक चौबे, लक्ष्मीबाई वाघमारे, यादव अमिलकंठवार, बाळू लोंढे, राजू यादव, सोनू उपाध्याय,व्यंकटेश साठे,अपर्णा चितळे,आशुतोष धर्माधिकारी, एकनाथ धमने, देवानंद जाजू, राजू गोरे, बालाजी अलमखाने, महादेव तिरवडे, रामराव पास्टे,माधव पांचाळ, भानुदास लोळगे, निखिलेश देशमुख, सुनील पाटील, बबलू यादव, आनंद बामलवा, रुपेश व्यास, माधव वाघमारे ,संदीप छप्परवाल, आशुतोष कपाटे, किरण मोरे, गणेश मोरे, गौरव कुंटूरकर, गजानन कत्ते, उमेश स्वामी ,सागर जोशी, बाबुराव लाड, प्रतापसिंह खालसा, साहेबराव गायकवाड, वैभव खांडेकर, दिगंबर लाभसेटवार, सुरेश नरवडे, विनय सगर, कृष्णा टोकलवाड, संतोष क्षिरसागर, कचरू बंडेवार, गजानन करपे, उमेश स्वामी, मधुकर मानेकर, बंडू कटवड, गणेश नरवाडे, गणेश बत्तलवार,राम वड, गणेश मोरे, अनिल लालवाणी यांच्यासह जवळपास हजारांहून अधिक भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते…—- Bracket —-【जोर जुलूम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है】रस्त्यावरची लढाई असुद्या किंवा विधिमंडळातील साहेब व त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांना पुरून उरतील, या राज्यसरकारनी नियोजनबद्ध पद्धतीने स्थानिक स्वराज संस्थांमधील ओ.बी.सी चे राजकीय आरक्षण संपवले आहे, त्या विरोधातील भाजपच्या या “चक्का जाम” आंदोलनात देवेंद्रजी सह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन केले ही फक्त आंदोलनाची सुरुवात आहे, ओ.बी.सी समाजाचे स्थानिक संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत होई पर्यंत थांबणार नाही.ओबीसी आरक्षणा संदर्भात भाजपा तर्फे तहसील कार्यालय,बिलोली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे,सदर आंदोलनाचे नेतृत्व विधानपरिषद आमदार मा.राम पाटील रातोळीकर साहेब* यांनी केले. यावेळी वैद्यकीय आघाडी चे प्रदेश संयोजक मा.डाॅ.अजितजी गोपछडे व जिल्हा सरचिटणीस मा.लक्ष्मणराव ठक्करवाड, मा.माणिकरावजी लोहगावे(ओबिसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष),मा.मारोती वाडेकर(अ.जा.प्रदेश उपाध्यक्ष), मा.श्रीहरी देशमुख नरगंलकर यांची उपस्थिती लाभली होती यासह उमाकांतराव गोपछडे,आनंदराव बिराजदार,शांतेश्वर पाटील, शंकरराव काळे,मा.विठ्ठलराव कुडमुलवार, नागनाथ पाटील माचनुरकर, श्रीनिवास पाटील नरवाडे, इंद्रजित यादवराव तुडमे,मा मोहन पा.जाधव,सतिष गौड, शिवकुमार कोदळे,मारोती राहीरे,संगीताताई मेरगेवार, शिवकन्या सुरकुटलावार,मिराताई संगनोर,सुलोचना ताई स्वामी, सर्व ओबीसी समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला…—- bracket —-एकतर ओबीसी आरक्षण द्या,नाहीतर खुर्च्या खाली करा!ज्यांनी सर्व समाजांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात निर्णायक लढ्याचा प्रारंभ झाला.कोरोनाच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या कानाकोपर्‍यात आज आंदोलन करण्यात आले. मी स्वत: नागपूर येथे आंदोलनात सहभाग घेतला.माझ्या सहकार्‍यांसह अनेक कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले…मा.देवेंद्र फडणवीसविरोधी पक्ष नेते विधानसभा,महाराष्ट्र—- Bracket —-राज्यातील महाविनाश आघाडी सरकारच्या ओबीसी समाजाबद्दल असलेल्या क्रूर भावनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले,परंतु ज्या काँग्रेसची भूमिकाच होती की “आरक्षण पद्धत संपली पाहिजे” ते त्यांनी सत्तेचा गैरवापर करत आरक्षण संपविण्याचा विडाच उचललेला दिसतोय. राज्य सरकार तर्फे आरक्षण विषयावर योग्य पर्याय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हा आरक्षण संघर्ष चालूच राहील.खा.प्रतापराव पा.चिखलीकर—- Bracket —-“आरक्षण आमच्या हक्काचं,नाही आघाडी सरकारच्या बापाचं”आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओ.बी.सी. समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले. या अन्याया विरुद्ध आणि ओ. बी.सी.ना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आज पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात जिंतुर येथे भाजपातर्फे चक्का जाम आंदोलनात करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी समाजातील नागरिक आपल्या हक्कासाठी भाजपा सोबत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले, तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…आ.मेघना साकोरे बोर्डीकरजिंतूर विधानसभा—- bracket —-“ओबीसी आरक्षण विषयी केंद्र सरकारमार्फत सामाजिक जनगणना झाली हे सर्व अहवाल सर्वोच्च न्यायालयात दिले असते तर आरक्षण टिकले असते.फडणवीस म्हणतात सत्ता द्या ओबीसी आरक्षण प्रश्न सोडवतो,देवेंद्र जी आम्हाला पण सांगा प्रश्न कसा सोडवणार? सत्ता मिळाल्याशिवाय तुम्ही महाराष्ट्राला मदत करणार नाही का? भाजपाची भूमिका ओबीसी नेत्यांना संपवण्याची होती. खडसे,भुजबळ यांना नाहक त्रास दिला तो कशासाठी? ओबीसी नेते व कार्यकर्ते संपले पाहिजे असे ध्येय असेल तर हा चक्काजाम कळवळा कशासाठी? तुम्ही तुमच्या पक्षाचा झालेला चक्काजाम सोडवा,आम्ही जनतेचे प्रश्न सोडवू…ना.जयंतराव पाटीलजलसंपदा मंत्री तथाप्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *