जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा चे मुख्याध्यापक – प्रतिबंधक विभाग औरंगाबाद च्या जाळ्यात…

जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा चे मुख्याध्यापक प्रतिबंधक विभाग औरंगाबाद च्या जाळ्यात…….. औरंगाबाद :- सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधि – तक्रारदार यांचा मुलगा शिकत असलेल्या जिल्हा परिषद अन्वी , तालुका सिल्लोड , जिल्हा औरंगाबाद येथील शाळेतून मुलाचे शाळा शिकत असल्याचे प्रमाणपत्र (बोनाफाईड) घेण्यासाठी व त्या प्रमाणपत्र मध्ये नाव दुरुस्ती करून देण्यासाठी तक्रार यांच्याकडे संजय मुरलीधर वाघमारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद हे 4000/- रु. लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली. सदर वृत्त असे की, तक्रारीचे अनुषंगाने लाचेच्या मागणीची शहानिशा केली असता , संजय मुरलीधर वाघमारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अन्वी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद यांनी तक्रारदार यांच्याकडे 4000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3,500/- रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद तर्फे सापळा आयोजित केला असता , संजय मुरलीधर वाघमारे मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडून 3,500/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण औरंगाबाद ग्रामीण येथे गुन्हा दाखल असल्याची प्रक्रिया सुरू आहे . सदर कारवाई पोलिस अधीक्षक मा. डॉ. राहुल खाडे , प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित , पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेशमा सौदागर यांनी केली आहे. त्यांना पोलीस अंमलदार रवींद्र आंबेकर , अरुण उगले , भूषण देसाई , चालक अंमलदार बागुल यांनी मदत केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *