जळगावच्या सेल्समनच्या बॅगेतून ९८ हजार लंपास ; जामनेर-बोदवड बसमधील घटना…

जळगावच्या सेल्समनच्या बॅगेतून ९८ हजार लंपास ; जामनेर-बोदवड बसमधील घटना.

बोदवड प्रतिनिधी : सबला उत्कर्ष न्यूज :- बसमधून प्रवास करणाऱ्या जळगाव येथील सेल्समनच्या बॅगेतून ९८ हजार रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी जामनेर-बोदवड प्रवासादरम्यान घडली. येथे हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव येथील सुनील ललवाणी हे कापडाचे सेल्समन असून ते २० वर्षांपासून गोधडीवाला टेक्सटाइल जळगाव येथे मार्केटिंग सेल्समनचे काम करतात. ते नेहमी कापड दुकानदारांकडे साडीची ऑर्डर घेणे, ऑर्डरचे पैसे जमा करण्यासाठी बसने ये-जा करतात.
सकाळी साडेदहा वाजता सुनील ललवाणी हे जळगाव येथून बसणे नेरी येथून साडीच्या बिलाचे १५ हजार १०० रुपये, पहूर येथून ५२ हजार ८०० रुपये व जामनेर येथून ३० हजार ६५ रुपये असे एकूण ९७ हजार ९६५ रुपये व्यापाऱ्यांकडून जमा केले. त्यानंतर ते जामनेर बसने पावणेचार वाजता जामनेर-बोदवड बसने बोदवड जाण्यासाठी निघाले.

बस बोदवड येथे बसमधून उतरताना त्यांना बॅगेची चेन त्यांना उघडी दिसली. त्यांनी पाहिले असता त्यात पैसे नव्हते. त्यांनी बोदवड बस स्टँड परिसर, मलकापूर चौक व इतर ठिकाणी पैशांचा शोध घेतला. पण पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे सुनील ललवानी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बोदवड तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, अशीही मागणी करण्यात येत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *