चेरपल्ली येथे पेयजल पाणीपुरवठा करा…

चेरपल्ली येथे पेयजल पाणीपुरवठा करा.

गावकऱ्यांनी केली मुख्याधिकारीकडे निवेदनाव्दारे मागणी.

आशिष सुनतकर
सबला उत्कर्ष न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

अहेरी :- पिण्याच्या पाण्यासाठी चेरपल्ली वासीयांना अनेक वर्षापासून त्रास सहन करावा लागत होता, गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तत्कालीन ग्राम पंचायत सदस्य विश्रांती सूनतकर यांच्या अथक प्रयत्नाने चेरपल्ली मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागातुन पाईप लाईन टाकण्यात आली होती.
मात्र सध्या स्थितीत पाणी नियमित सोडत नसल्याने आणि ठीक-ठिकाणी पाईप लाईन फुटून असल्यानें नागरीकांना पाणीच मिळत नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर पेयजल पाणीपुरवठा करण्यात यावे म्हणून चेरपल्लीवासीयांनी मुख्याधिकारीकडे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 16 चेरपल्ली मध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे, नगर पंचायत होऊन 5 वर्षांचा कालावधी लोटत आहे, तरी नगर पंचायत तर्फे पाणीपुरवठा व्हायला पाहिजे होता, परंतु ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत पाणीपुरवठा सुरू असल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. आठवड्यातुन 2 ते 3 वेळा पाणी सोडले जातात, मात्र पाईप लाईन ठिकठिकाणी फुटून असल्याने सर्व नळांना पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अहेरी गाठावे लागत आहे.
प्रभाग क्र. 16 चेरपल्ली नगर पंचायतिच्या हद्दीत असून नगर पंचायत विभाग नागरीकांनकडून कर घेतात आणि पाणीपुरवठा ग्रामीण पाणीपुरवठा विभागातुन होत असल्याने नागरींकामध्ये गैरसमज निर्माण होत आहे. सदर पाणीपुरवठा नगर पंचायत कडून झाल्यास चेरपल्ली वासीयांना नियमित पाणीपुरवठा होईल अशी मागणी चेरपल्ली वासीयांनी केली आहे, यावेळी किशोर सुनतकर, अरुण रामटेके, दीपक सुनतकर राजन्ना चौधरी आदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *