कोरोना हा आजार नाही;चायनाचा जैविक हल्लाच! – इन्द्रेश कुमार जी…

सबला उत्कर्ष न्यूज – गजानन जोशी

भारत तिब्बत सहयोग मंच दक्षिण भारत कार्यकर्ता संमेलन सम्पन्न कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रीय सदस्य तथा भारत तिब्बत षयीग मंच मुख्य मार्गदर्शक इन्द्रेश कुमार म्हणाले की,कोरोना हा आजार नसून चायनाने जगभरात आक्रमण करणे हा उद्देश ठेवून बनविलेला जैविक व्हायरस आहे..

या व्हायरस बनविण्यादरम्यान ते वैज्ञानिक जिवंत आहेत का गेले हे कोणालाच माहिती नाही…

चायना ही जगाची आर्थिकता ढासळण्यासाठी प्रयत्न करते,२०१९ साली काही चायना मोबाईल कंपन्यांचे नुकसानीबाबत वक्तव्य केले होते,की साधारण १ करोड २५ लाख युजर्स कमी झाले,ते मोबाईल वापरणारे गेले कुठे असे सवाल केले होते..

हा व्हायरस चायनातून गेला नाही,दुसऱ्या शहरातून गेला,संपूर्ण जगातील १३० देशात आपोआप पोहचला गेला हे चुकीचे उत्तर दिले.
मानवी वेपन म्हणून चायनाने हा हल्ला केला,चीन मानवतावादी नाही,राक्षसवादी देश आहे,कोणाला शंका असेल तर मन-मस्तिष्क एक करून विचार करा.
चीनच्या क्रूरतेला अंत नाही,एका दिवसाच्या अर्ध्या रात्रीत टॅंक च्या खाले घालून लाखो जणांची हत्या केली होती,परम पावन दलाई लामा चीनच्या क्रूरतेला लढण्यासाठी अरुणाचल प्रदेश मार्गे भारतात प्रवेश घेतला,त्यावेळी तिब्बतची ६० लाख लोकसंख्या होती,तिब्बतला मिळविण्यासाठी कत्लेआम (नरसंहार) चीनने केला.
आपल्या धर्मासाठी व देवभूमी (धरतीसाठी) जगणारी शांत मंडळी होती,चीन फंडामेंटलिस्ट देश आहे,संवैधानिक नाही.

या दीड वर्षाच्या काळात आम्ही संशोधन करताना (व्हायरस) बनवताना काही चूक घडली असावी असे कोणतेही शांतताप्रिय वक्तव्य चायनाने दिले नाही.

बायोवेपन म्हणून कोरोना व्हायरस चा चायनाने उपयोग केला,ज्या चीनने करोडो लोक संक्रमित केले लाखोंच्या संख्येने लोक मृत पावले,मरकज (तब्लिगी) याचा उपयोग केला गेला,त्यामुळे देशभरात हाहाकार माजवला गेला..

【Only bharat came one Korona Time】

१. आपण हायड्रोक्लोरोक्वीन दिले.

२. युनानी आयुर्वेदिक,होमिओपॅथीक हिमालयीन वनस्पती यांचे काढा व औषधी मोठ्या प्रमाणात दिले.

३. योगा व प्राणायाम

४. कपड्याचे मास्क,सॅनिटायझर

५. ताली,थाली,घंटानाद,दिवा लावणे.(ऊर्जा निर्मितीसाठी)मार्गदर्शन केले.

६. को-वॅक्सिन दिले.

७. सामाजिक अंतराचे पालन करणे,याचे धडे दिले.

संपूर्ण जगातील भारत देशाचे एकमेव व्यक्ती व असा देश,प्रति पंधरा दिवसाला प्रत्येक देशाच्या हालचाली विचारण्यासाठी पुढाकार घेणारे आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आहेत.
राजकीय नजरेने बघू नका,मानवता विचाराने काही क्षण विचार करा,त्यानंतर मोदींकडे व आपल्या देशाकडे पहा.

यादरम्यान संपूर्ण जगभरात या कोरोना व्हायरस वरील औषधनिर्मितीसाठी चुरस लागली..

सर्वात पहिले चीनने वॅक्सिन केला,पण चाचणी अहवाल अपयशी ठरला.
अमेरिका,युरोप,इंग्लंड यांनी वॅक्सिन बनविले पण त्यांची किंमत ३००० ठेवली गेली,त्यामुळे हे पण अपयशी ठरले.

भारतात ५ जागेवर प्रयत्न चालू होते,यापैकी ३ जागेवर (पुणे,हैदराबाद,अहमदाबाद) इथे यश आले,इथूनच सम्पूर्ण जगाला विश्वास झाला की,भारत देशाने ही लस बनविली याचे प्रमाणीकरण तपासू म्हणून ७३ देशांनी एक्सपर्ट पाठवून या संशोधन केंद्राची पाहणी करून लस विषयी माहिती घेतली व ती यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले.

अश्या भारताचा आपण स्वीकार करणार नाही का? आपण जल्लोष करणार नाही का? कमीतकमी किमतीत संपूर्ण जगभराला ही लस उपलब्ध करून देणे म्हणजे सहज सोपा काम नव्हतेच ते आपल्या भारताच्या मोदींनी करून दाखविले,जगभरात भारत देश हा सक्षम,यशस्वी ठरला आहे.

आगामी काळात तिसरे लसीकरण निर्माण होत होते,icmr टीम मला भेटली व त्या लसीबाबत त्यांनी माहिती दिली,आणि ज्यावर संशोधन चालू आहे,कसलेही प्रमाणित नाही ती लस मी स्वतः घेतली,तुम्ही तर प्रमाणित लस घेणार आहात,हे सर्व भिऊन नाही तर विश्वासाने हे लसीकरण मी घेतले..

यासाठी त्यागी वृत्तीला पाहून प्रत्येक देश जगभरात भारतासमोर नतमस्तक होत आहे,एक मात्र मानवतावादी देश म्हणून आपली ओळख निर्माण होते आहे.

भारत भरपूर बदलला आहे,दररोज बदलत आहे जगभरातील कोणताही देश भारताला आतून व बाहेरून कधीच बिघडवू शकणार नाही असा भारत निर्माण होतोय.

शताब्दी युगांपासून भारताकडे सीमांवर भूमी हडपण्यासाठी चायना प्रयत्नात आहे,भारत भरात तिब्बती लोक १ लाखांहून अधिक आहे,व ३५ हजार फक्त कर्नाटकातच आहेत,म्हणजे देशाचा एक चतुर्थांश भाग कर्नाटकात आहे,या सर्वांना मान-सन्मान,पालन पोषण करून अनेक वर्षांपासून त्यांना जगण्याची दिशा दिली,यासाठी कन्नड भाषी व कर्नाटक सरकार यांना मनापासून धन्यवाद असतील.

चायनाने तिब्बत मिळविल्यानंतर अराजकता माजविली,तैवानला देश नाही,कमचोरीया,मंगोलिया वर कब्जा मिळविला आहे,मलयसागर चा संबंध कर्नाटक,केरळ,तामिळ सीमेशी येतो,हा भाग शांत व शीतल आहे,याभागाला आपण दक्षिणी चिनीसागर म्हणायचे नाही,मलयसागर म्हणायचे…

डोकलाम ब भूटानचा भाग आहे,यांच्याकडे सीमा सुरक्षा नाही यांना सीमांत सुरक्षा भारतातर्फे पुरविली जाते,तसेच आतंकवादाबद्दल १२६ देशांनी भारताला पाठिंबा देत,चायनाला अपमानित केले होते,मस्ती जिरविली होती.यानंतर पुलवामा हल्ल्याचे थेट उत्तर म्हणून भारताने सर्जिकल स्ट्रईक केले,त्यामुळे चायना उपग्रहाच्या पकड मध्ये आपण आलो नाहीत,अस संदेश गेला,त्यामुळे आपण(भारत) सक्षम आहोत हे चायनाला समजले,चीनकडून पाकिस्तान तर कधीच सुरक्षित नाही.

भारत आता पुर्वीसारखा कमकुवत देश राहिला नाही,हिमालयाअंतर्गत लदाख ते लेह पर्यंत आम्ही कमी वेळात सडक मार्गाने फेरफटका मारू शकतो,लढाऊ सराव आम्ही करू शकतो,अशी ताकद जगासमोर तयार झाली आहे.

एक एक इंच भूमीची रक्षा करणे हे भारत जाणतोय,आपण सशक्त भारताकडे वाटचाल करतोय,३७०(३५a) मुळेच आतंकवाद,माओवाद कहरतेने देश त्रस्त होता,पण प्रधानमंत्री व सरकारच्या प्रयत्नाने एक भारत,एक देश,एक संविधान तयार झाला,अकसाई चीन,पी.ओ,जे.के सगळा भारताचाच भाग आहे.

तिबेट,तैवान,हाँगकाँग,सिंकँग, मलयसागर (सी-ट्रेड सह) चायनाचा दादागिरी पासून मुक्त व्हावा,हा भारत तिब्बत सहयोग मंच व माझा मानस आहे,लवकरच मन:पूर्ती होईल,१९९९ साली परम पावन दलाई लामा यांना प्रत्यक्ष भेटून दर्शन केले तेव्हा असे जाणवले की जिवंत देव मी पाहतोय,मागील २० वर्षांपासून हे संघटन चिनी मालाचा बहिष्कार करत,स्वदेशी उत्पादनाचे अवलंब करण्याचे संदेश देत आहे,यासोबत गत काही वर्षांत स्वदेशी उत्पादनाला चालना मिळाल्याने करोडो रुपयांचे नुकसान चायनाला पोहचले आहे.

भारत देशाने काय केले?
१. संरक्षण करार रद्द केले.

२. महामार्गाचे सर्व करार रद्द केले.

३. चायना अँप बंद केले.

आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी अँप वापरा हे आवाहन केले,अचानकपणे भारताने न बोलता कृतीतून चायनाला करोडो रुपयांचा आर्थिकतेने झटका दिला,ही नुसती भूमी नाही “भारतमाता” म्हणजे आपली मातृभूमी आहे,यासाठी संघर्षाने बलिदान होते,समझौता नाही,असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय सदस्य तथा वरिष्ठ प्रचारक इन्द्रेश कुमार जी यांनी कटू पण सत्य असलेले मार्गदर्शन दक्षिण भारतातील बेंगळुरू शहरातील बैठकीदरम्यान शेकडो कार्यकर्त्यांना केले,या कार्यक्रमास राष्ट्रीय महामंत्री पंकज गोयल,राष्ट्रीय मंत्री नरसिंग मेंग,कर्नाटक प्रभारी सुरेश जी,दासा जीवनज्योती,कर्नाटक राज्य अध्यक्ष राजशेखरा,अमूल्य सेवा देणारे पदाधिकारी,महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *