औरंगाबाद शहरात जनावरांच्या ढेपेच्या पोत्यात गुटख्याची तस्करी, 15 लाखाचा पकडला गुटखा…

औरंगाबाद शहरात जनावरांच्या ढेपेच्या पोत्यात गुटख्याची तस्करी, 15 लाखाचा पकडला गुटखा.

औरंगाबाद शहरात पकडला 15 लाख रुपयाचा गुटखा…


औरंगाबाद : 22 ऑक्टोबर( सबला उत्कर्ष न्यूज ) उस्मानपूरा पोलिसांनी गुटख्याचे 42 पोते भरलेला टेम्पोसहीत 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांना गोपनीय माहिती मिळाली अवैध प्रतिबंधित हीरा गुटख्याने भरलेला एक टेम्पो मिलिंदनगर उस्मानपूरा भागातून जाणार आहे. त्याबद्दल अन्न सुरक्षा विभागाचे श्री. शहा यांना कळवण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी अजिंठेकर यांना पोलीस स्टेशन उस्मानपूरा येथे सोबत पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके स्टाफसह अण्णाभाऊ साठे चौक येथे सापळा लावून थांबले. अशोक लेलैंड क्रं. MH-20, EL-5052 हा या चौकात आला असता टेम्पो थांबवून तपासणी केली असता पाठीमागे जनावरांसाठी लागणारे ढेपेची पोती दिसून आली. त्याचे मागे लपवून ठेवलेली आठ लाख रुपये किमतीचे हिरा गुटख्याची एकूण 42 पोती मिळून आली. टेम्पो चालक शाम गोपाळराव मालशिखरे, वय 48, रा.गणेशनगर, पुंडलिकनगर पोलीस स्टेशन जवळ, औरंगाबाद यास टेम्पोसहीत अटक केली आहे. उस्मानपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 दिपक गि-हे, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपूरा विभाग, निशिकांत भूजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप तारे, पोउपनि कल्याण शेळके, पोशि अशरफ सय्यद, सतिष जाधव, संतोष सिरसाट, प्रकाश सोनवणे यांनी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *