भाजपने पायात चपला घालून केलेल्या आंदोलनाला युवासेनेचे प्रतिउत्तर…गोमूत्र दुग्धाभिषेकाने केले श्रीक्षेत्र मुक्ताई मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसराचे शुद्धीकरण…

मुक्ताईनगर : सबला उत्कर्ष प्रतिनिधी भावेश पाटील : कोरोना च्या पार्श्वभूमीवर देश व राज्यभरातील मंदिरे बंद आहेत.कोरोना काळात भाजप ने निव्वळ राजकारणनच केलेले अख्खा महाराष्ट्र पहात आहे .आज घडीला दर दिवसाला कोरोना संसर्गाने हजारो नागरिक बाधीत होत आहे .अगदी जीव मुठीत धरून नागरिक स्वतःला कोरोना पासून वाचवत आहेत .व दवाखाना म्हटला की त्यांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. अशा गंभीर परिस्थितीत भाजप ने राज्यभरात घंटानाद आंदोलन केले . मुक्ताईनगरातही भाजप पदाधिकाऱ्यांनी तिर्थक्षेत्र श्री संत मुक्ताई पवित्र मंदिर सभागृहात चपला घालून घंटानाद व शंख वाजवून आंदोलन केले. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य खंडित झाल्याचा सुज्ञ नागरिकांनी आरोप केला . तसेच याचसंदर्भात सोशल मीडियात असंख्य वारकरी बांधव यांनी देखील मंदिरात चपला घातल्यावर देखील आक्षेप घेत यावर टीका केली आहे. तर मंदिर व संस्कृतीच्या नावाखाली राजकारण करणे आद्य कर्तव्य असतांना मंदिराच्या गाभाऱ्याजवळ चपला नेतात व घंटानाद तसेच शंखनाद करतात. ही कोणती संस्कृती आहे .यामुळे तमाम वारकरी व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत .

       यामुळे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहणे साठी युवासेना,मुक्ताईनगर तर्फे पुरोहितांच्या विधीवत मंत्रोच्चारात चक्क गोमूत्र , पंचामृत व दुग्धाभिषेकाने मंदिराचा गाभारा  पवित्र करून मंदिर परिसराचे शुद्धीकरण आंदोलन  करण्यात आले.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *