उद्धव ठाकरे सरकार चा मोठा निर्णय!राज्यात सीबीआयला तपासबंदी…

उद्धव ठाकरे सरकार चा मोठा निर्णय!राज्यात सीबीआयला तपासबंदी.

मुंबई : सबला उत्कर्ष न्युज ( भावेश पाटिल ) :-राज्यातील सुशांत सिंग प्रकरण नटीआरपी प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून राज्यात आता सीबीआयला तपास बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या गृहविभागाने आदेश काढले आहेत.

केंद्र सरकार व राज्य सरकार मध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण घेतले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांच्यात राजकीय डावपेच आखले जात आहेत. यामध्ये राज्यातील प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने बंदी घातली आहे. यासोबत टिआरपी घोटाळ्याचा तपासही राज्य सरकारने निष्फळ असल्याचे मानत आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस राज्यातील सत्ताधाऱ्यांना वाचत असल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षाच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात बिहार मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. यामध्ये निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानेही सीबीआयकडे तपास कायम ठेवला होता. मात्र राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याकारणाने राज्यात सीबीआयचा तपास बंदी करण्यात आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *