सहामहिन्यापासुन पूसूकपल्लीचे स्ट्रीट लाईट बंद ग्राम पंचायत नागेपल्लीचे दुर्लक्ष…

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. सबला उत्कर्ष न्यूज.

अहेरी :- ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येते असलेल्या पुसुकपल्ली गावामध्ये लाँग डाँवुन पासून सहा महिन्याच्या कालावधी लोटूनही अजून पर्यंत गावातिल विदय्त् खांबांना अजूनही लाईट नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे.
ग्राम पंचायत नागेपल्ली अंतर्गत यत असलेल्या पुसुकपल्ली गावामध्ये जवळपास१००० पेक्षा जास्त नागरिकांच्या वास्तव आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून गावामधील प्रत्येक विदयुत खांबांना लाईट लाईट लावने गरजेचे आहे मात्र सहा महीन्याचा कालावधी लोटुनही लावण्यात आले नाही.
यामुळे रात्री बेरात्री बाहेर पडता येत नाही पुसुकपल्ली गाव हे संपूर्ण जंगल लात गाव आहे त्यामुळे जंगली हिंसक प्राणी व सरपटणारे प्राणी गावाकडे घाव घेत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच गावातील वारंवार ग्राम पंचायतीकडे स्ट्रीट लाईट लावण्यात यावे म्हणून तक्रार करून सुध्दा आकिवात्यांचे दुर्लक्ष होत आहे.
गावातील नागरिकांना रात्री बेरात्री आरोग्य संबंधित काही कमी. जास्त झाल्यास रात्री अंधारात घरातून बाहेर पडायला भिती लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी माहिती दिली आहे.

कोंड: गेल्या सहा महिन्यापासून गावातील स्ट्रीट लांईट बंद आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहेत. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर गावातील स्ट्रीट लांईट लावून देण्यात यावे अशी मागणी रमेश भोयर .शंकर काटेल आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *