पाचोरा बाजार समितीचे सचिव निलंबित…

  • प्रशासकपदी सहाय्यक निर्बंध क नामदेव सुर्यवंशी :-
  • पाचोरा : सबला उत्कर्ष ( भावेश पाटील प्रतिनिधी ) :- पाचोरा येथील बाजार समितीच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने समितीच्या सचिवाचे निलंबनाने एकच खळबळ उडाली आहे. बाजार समितीच्या प्रशासकपदी सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला.
  • महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १४ (३) व (अ) च्या तरतुदीअन्वये राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत. अशा उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका दि. २४ जुलै २०२० पासुन सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पाचोरा – भडगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे निर्वाचीत सदस्यांचा कार्यकाळ दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी संपुष्टात आल्याने शासनाकडुन बाजार समिती याबाबत संचालक मंडळास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याने दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी सहकारी संस्था जळगांवचे उप निबंधक संतोष बिडवई यांचे आदेशानुसार सहकारी संस्था पाचोराचे सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी यांची येथील बाजार समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक पदाचा पदभार नामदेव सुर्यवंशी यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी स्विकारते वेळी बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरूडे यांचे पदभार स्विकारते प्रसंगी उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. तशा सुचनाही त्यांना आधी देण्यात आल्या होत्या. परंतु बी. बी. बोरुडे हे हेतुपुरस्सर यावेळी उपस्थित नसल्याने यांचे निलंबन करुन सचिवांचे दालन सील करण्यात आले आहे. या कार्यवाहीमुळे पाचोरा – भडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *