अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचे कांदा निर्यातबंदीवर निवेदन दिले… तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन बंदी उठविण्याची तीव्र मागणी.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ( सबला उत्कर्ष न्यूज ) :

अहेरी : केंद्र शासनाने कांदावर निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनेच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन कांदाची निर्यात बंदी तात्काळ उठविण्याची तीव्र मागणी केले.
निवेदनात म्हटले की, मोठया मेहनतीने शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेत असतो, परंतु केंद्र शासनाने कांदावर निर्यात बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत असून कांदा खरेदीसाठी व्यापारी उत्सुक नाही पर्यायाने अत्यल्प भावाने कांदा विक्री करावे लागत आहे हे परवडण्यासारखे नसून एकप्रकारे शेतकऱ्यांची गोची केल्यासारखे होत आहे म्हणून तात्काळ कांदावर निर्यात बंदी उठवावी यासाठी निवेदन आणि सोबतच कांदेही तहसीलदार यांना भेट देऊन केंद्र शासनाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनानी निषेधही व्यक्त केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात निवेदन व कांदे भेट देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, नगरसेविका अर्चना विरगोनवार, ममता पटवर्धन, सुवर्णा पुसालवार आदी महिला उपस्थित होत्या.

कोट
शेतकरी कोणतेही पीक पोटच्या पोराप्रमाणे घेत असतात, त्यातल्या त्यात कांदा तर शेतकरी अथक परिश्रमाने पिकवीत असतो, अचानक कांदावर केंद्रशासनाने निर्यात बंदी घातल्याने व्यापारी कांदा घेण्यास उत्सुक नसल्याने अत्यल्प भावात कांदा विकावे लागत आहे, कोरोनाच्या महामारीत केंद्र शासनाच्या कांदानिर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अजून पाणी आणले आहे त्यामुळे सदर बंदी उठवावी व महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावे.
शाहीन हकीम
राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्याध्यक्ष, गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *