आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.
जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नऊ महिला रणांगिनींचे सत्कार!
गरीब परिवारांना ब्लँकेटचे वाटप….

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : सबला उत्कर्ष न्युज –

गडचिरोली/अहेरी:– मंगळवार 20 ऑक्टोंबर रोजी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अहेरीच्या राजवाड्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने नऊ रणागिनींचे सत्कार करण्यात आले. नवरात्रोत्सव सुरू असल्याने जिल्ह्यातील नऊ रणागिनींचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, रा.महिला काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा पूर्वा ताई दोंतुलवार, तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवर, ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई अलोने, उपस्थित होत्या.
जागर नारी शक्तीचा या उपक्रमातून शिक्षण क्षेत्रातून प्राची कोठारे,(चामोर्शी) वैदयकीय क्षेत्रातून डॉ. संगीता मेडी(जिमलगट्टा), राजकीय क्षेत्रातून भाग्यश्री लेकामी, (भामरागड),कराटे पट्टू म्हणून एंजल देवकुले (गडचिरोली), कुस्तीतुन हिना शकील शेख (सिरोंचा), शिक्षण क्षेत्रातून कौमुदी श्रीरामवार (आष्टी), गावातील पाण्याची समस्या दूर केले म्हणून माया सूर्यवंशी (नवरगाव), आत्मनिर्भर महिला म्हणून किरण कुर्मावार (रेगुंठा), शेफ मधून कल्याणी पुण्यरपवार (गडचिरोली) आदी नऊ रणागिनींना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र बहाल करून भावपूर्ण सत्कार करण्यात आले.


तसेच यावेळी नगर पंचायतीतील कामगार व सफाईगारांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
आलापल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई अलोने यांच्या वतीने गरीब परिवारांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते गरीब परिवाराला ब्लँकेट वितरित करण्यात आले एकंदरीत विविध सामाजिक उपक्रम राबवून आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस साजरा करण्यात आले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *