Breaking : रावेर शहरानजीकच्या खून प्रकरणी चौघे अटकेत…

Breaking : रावेर शहरानजीकच्या खून प्रकरणी चौघे अटकेत.

रावेर प्रतिनिधी (मयुर वाघुळदे) :- रावेर शहरानजीक काल झालेल्या तरूणाचा खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल बर्‍हाणपूर -अंकलेश्‍वर महामार्गाला लागून एका प्लॉटिंग टाकलेल्या ठिकाणी रावेर शहरा नजिक एका ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्युदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. कालच घटनास्थळी पोलिस निरिक्षक एस. टी. पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक , पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव यांनी चौकशी सुरू केली होती.

दरम्यान, रावेर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या खूनाचा उलगडा केला आहे. या प्रकरणी चार आरोपीची ओळख पटली असून चारही जेरबंद करण्यात आले असल्याची माहीती पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी पत्रकारांना दिली. महेश विश्‍वनाथ महाजन, विकास गोपाल महाजन, विनोद विठ्ठल सातव, भैय्या दुबी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. रावेर ही आरोपींची नावे असल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी डिवायएसपी राजेंद्र रायसिंग, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे आदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *