निफाड येतील कोवीड सेंटरची पाहणी करून कोरोनाबाबतची माहिती घेतांना अनिल कदम…

नाशिक-निफाड :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नांने पिंपळगाव बसवंत येथे साकारलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला आज मा.आमदार अनिल कदम यांनी भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन आरोग्य यंत्रनेला निर्देश दिले.

निफाड येतील covid-19 सेंटर..

निफाड तालुक्यात कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी तहसिलदार दीपक पाटील, बीडीओ संदीप कराड यांच्यासह आरोग्य यंत्रनेला तालुक्यातील रुग्णाना पुरेश्या आरोग्य सुविधा मिळणेकमी निर्देश दिले. त्यानंतर ओझर येथे मा.आमदार अनिल कदम यांनी कोरोनाबाबत तहसीलदार दीपक पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन ओझरच्या कोविड रुग्ण नियंत्रणबाबत चर्चा केली.

पिंपळगाव कोविड सेंटरच्या पाहणीवेळी मा.आमदार अनिल कदम यांच्या समवेत शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्करनाना बनकर, जि.प सदस्य दिपक शिरसाठ, तहसीलदार दिपक पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी संदिप कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रोहन मोरे, डॉ.भुषण आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता छापरवाल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्य शिवापाटील सुरासे, राजेश पाटील, शंकर संगमनेरे, शहाजी राजोळे, गोटू बागूल, शिवसेना शहरप्रमुख नितिन बनकर, निलेश मोरे,भाऊ घुमरे, योगेश कुयटे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.!

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *