पुण्यात बोगस रेशनकार्ड बनविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

पुण्यात बोगस रेशनकार्ड बनविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल,
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सबला उत्कर्ष न्यूज :- पुण्यात रेशनिंग कार्ड काढण्यासाठी एजंट किती पैसे घेतात हे सर्वांना माहीत आहे. सरकारी कार्यालयाचे उंबरठे नागरिकांना झिजावे लागत असल्याने झटपट काम व किटकिट नको म्हणून नागरिकांसमोर एंजटच हा पर्याय असतो.

परंतु नागरिकांचा विश्वघात काही एंजट करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. येरवडा येथील अन्न धान्य ” ई” परिमंडळ विभागाच्या नावाने दिलेली शिधापत्रिका बोगस निघाल्याची घटना येरवडा मध्ये घडली आहे.

बनावट रेशनिंग कार्ड बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अन्न धान्य “ई” परिमंडळ अधिकारी प्रशांत खताळ वय ३२, रा. क्वीन्स गार्डन यांनी फिर्याद दिली आहे.आरोपीने त्याच्याकडील शिधापत्रिकेमार्फत सरकारी धान्य दुकानातून राशन घेतले होते. मात्र दुसऱ्यावेळी त्याला रेशन मिळाले नाही. त्यामुळे तो परिमंडळ कार्यालयात चौकशीसाठी गेला होता.

त्यावेळी त्याने राशन मिळत नसल्याची तक्रार केली असता,
खताळ यांनी त्याची शिधापत्रिका तपासली त्यावेळी ती बनावट असल्याचे समोर आले.

त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने ती शिधापत्रिका एका एंजटाकडून तयार करून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलिस ठाणे करित आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *