0Shares

*शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द ची घोषणा :पाचोर्यात कॉंग्रेसचा जल्लोष*

सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी सतीष ब्राह्मणे*पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांवर अन्याय करणारे काळे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान यांनी केल्यामुळे हा लोकशाहीचा विजय म्हणून पाचोर्यात कॉंग्रेस ने जल्लोष केला**शेतकर्‍यांवर अन्याय करणारे तिन काळे कायदे भाजपा प्रणित मोदींनी आणले होते. याविरोधात जोरदार निदर्शने शेतकर्‍यांनी भारतभर केले तर आजही दिल्ली च्या बॉर्डर वर शेतकरी आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकरी शहीद झाले. लोकशाही च्या देशात अखेर पंतप्रधान मोंदीना झुकायला भाग पडले याचे फलीत म्हणून आज तिन काळे रद्द ची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या घोषणेमुळे पाचोरा काॅग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी करुन जल्लोष करण्यात आला यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, राजु महाजन, प्रा. एस. डी. पाटील, मुख्तार शहा, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, महीला कॉंग्रेस तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, सचिव संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्ताफ पठाण, फारुख शेख, अरबाज पठाण, रवी पाथरवट, इब्रान खान, समाधान ढाकरे,कुंदन परदेशी आदि उपस्थित होते*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

0Shares