0Shares

सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी अजीज शेख

मुस्लिम बेलदार समाजाच्या वतीने आसीम खान यांचा भव्य सत्कार
यावर्षी यू.पी.एस.सी परीक्षा पास करणारे धुळे येथील रहिवासी तसेच शहादा येथील जावाई आसीम खान हाजी किफायत खान व शहादा येथील आसीम शेख यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणुन निवड झाल्या बद्दल शहादा मुस्लिम बेलदार समाजातर्फे बेलदार जमात खाना गरीब नवाज कॉलनी येथे भव्य सत्कार करण्यात आला
केंद्रीय लोक सेवा आयोग परीक्षा यू.पी.एस.सी ही भारतातील सर्वात कठीण परिक्षापैंकी एक मानली जाते आणि ही परीक्षा आसीम खान यांनी देशात ५५८ वा क्रमांक पटकावला आहे
सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे आसीम खान यांचे संपुर्ण शिक्षण हे ऊर्दू माध्यमातून झाले आहे तसेच त्यांनी यू.पी.एस.सी ची परीक्षा सुध्दा ऊर्दू माध्यमातुनच दिली आहे
भारतातुन ऊर्दू माध्यमातुन परीक्षा पास करणारे या वर्षी आसीम खान हे एकमेव उमेदवार आहेत केंद्रीय लोक सेवा आयोगाचे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आसीम खान यांचे मुस्लिम बेलदार समाजाच्यातर्फे ट्रॉफी शाल आणि पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले
यावेळी त्यांचे वडील हाजी किफायत खान यासीन खान , सासरे सईद शेख कादर , चुलत भाऊ हाजी बलदार खान , भाऊ अब्दुल कैय्युम खान , जिजाजी फिरोज खान , नईम अली यांचे ही पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले
यावेळी आसीम खान यांनी सांगितले की शिक्षण हे आजच्या काळाची गरज बनले आहे आजवर माणुस जी प्रगती साधू शकला आहे ती फक्त आणि फक्त शिक्षणाच्याच जोरावर शिक्षणामुळेच माणसाला चांगला व वाईट गोष्टीचे ज्ञान होते व माणुस योग्य ते मार्ग निवडुन आपल्या जीवनाची पुढे वाटचाल करीत असतो शिक्षण हे माणसाला पदोपदी उपयोगी पडत असतो आणि ते माणसाच्या शेवट पर्यन्त त्याची साथ सोडत नाही म्हणुन आपल्या मुलांच्या शिक्षणावर भर द्या शिक्षण आजच्या काळाची गरज आहे
 असे आसीम खान यांनी या वेळी सांगितले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहादा मुस्लिम बेलदार जमातने परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम अंसारी सर यांनी केले तर आभार अब्दुल रहीम सरांनी मानले
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

0Shares