0Shares

*ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर भ्याड हल्ल्याचा धुळे जिल्हा AIMIM पक्षाच्या वतीने जाहीर निषेध

आमदार फारूक शाह यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला निषेध मोर्चा..!*

रिपोर्ट सलमान शाह*आमदार फारूक शाह यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून अटक..!*

(धुळे दि. २२-०९-२०२१) समाज कंटकांनी मंगळवारी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची तोडफोड केली. समाज कंटकांनी आंदोलन करत ओवेसींच्या घराची तोडफोड केली आणि समाज कंटकांनी खासदार असदुद्दीन ओवेसी यांना धमकावले आहे. समाज कंटकांनी मंगळवारी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या २४-अशोक रोड, नवी दिल्ली येथील निवासस्थानी निदर्शने केली आणि तोडफोड केली. आंदोलकांनी ओवेसी यांच्या घराबाहेर नेम प्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडल्या. या दरम्यान असदुद्दीन ओवेसी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. घरावरील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा या धर्मांधतेला जबाबदार आहे असे म्हटले असून एखाद्या खासदारांच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्यास त्यातून काय संदेश जातो असा सवाल आमदार फारूक शाह यांनी विचारला तसेच त्यांचे कोट्यावधीच्या संख्येत चाहते असून त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. आपले मत व्यक्त करणे हा अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे तो अश्या हल्ल्यांनी कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची तोडफोडीचा धुळे जिल्हा AIMIM च्यावतीने निषेध करत असून अशा प्रकारे हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर धुळे जिल्हा AIMIM च्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार फारूक शाह यांच्यासह नगसेवक युसुफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, युवा अध्यक्ष सेहबाज फारूक शाह, साबीर पत्रकार, अमीर पठाण, साजीद साई, सलीम अन्वर शाह, निजाम सय्यद, राजू भाई, हलीम अन्सारी, आसिफ पोपट शाह, परवेज शाह, रफिक शाह पठाण, शोएब मुल्ला, निसार अन्सारी, माजीद पठाण, इरफान, नजर खान, कैसर पेंटर, चिराग खतीब, शाहीद सर, सऊद सरदार, जुनेद पठाण, समीर मिर्झा, सलमान खान, युसुफ पिंजारी समीर शेख, शाकीब हाजी आदी पदाधिकारी व कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!